Laughter Chefs 3 : लाफ्टर शेफ्स 3'च्या ट्रॉफीवर अली गोनी-जन्नत जुबैरचं नाव; ९९ स्टार्ससह ठरले विजेते

मुंबई : कलर्स टीव्हीचा (Colors TV) लोकप्रिय कॉमेडी कुकिंग शो (Comedy Cooking Show) 'लाफ्टर शेफ्स सीझन 3' (Laughter Chefs Season 3) अखेर संपन्न झाला असून अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि अभिनेत्री जन्नत जुबैर (Jannat Zubair) यांनी ट्रॉफीवर आपले (Winner) नाव कोरले आहे. अंतिम फेरीत (Grand Finale) अली आणि जन्नत यांनी तब्बल ९९ स्टार्स (Stars) मिळवत ट्रॉफी (Trophy) पटकावली. तर तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)-अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra)-एल्विश यादव (Elvish Yadav) या जोड्या ७५ स्टार्ससह उपविजेत्या (Runners-up) ठरल्या.


स्पर्धेदरम्यान प्रत्येक आव्हानानंतर (Challenge) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जोड्यांना स्टार्स दिले जात होते. हेच स्टार्स गुणफलकावर (Scoreboard) जमा होत गेले आणि त्यावरून विजेता निश्चित करण्यात आला. अली आणि जन्नत यांनी ट्रॉफीसोबतच स्मार्टफोन (Smartphone) आणि प्रायोजकांकडून (Sponsors) विशेष भेटवस्तूही जिंकल्या. शोचा शेवट होताच सर्व स्पर्धक आणि कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.


अली गोनीने विजयानंतर भावना व्यक्त करताना सांगितले की, "फायनलची (Finale) घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या. आम्ही अनेक शो केले आहेत, पण असा शो क्वचितच मिळतो जिथे प्रत्येकाशी इतकं जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. येथे मत्सर किंवा वादापेक्षा मैत्रीच अधिक होती."



दरम्यान, जन्नत जुबैरने इन्स्टाग्रामवर (Instagram) भावनिक पोस्ट (Post) शेअर करत लिहिले, "या शोने मला आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणी, सुंदर नाती आणि माणसं दिली. हा माझ्यासाठी फक्त आणखी एक शो नव्हता. 'लाफ्टर शेफ्स सीझन 3' च्या ग्रँड फिनालेनिमित्त (Grand Finale) प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा या सेटवर माझ्या लोकांसोबत परतण्याची आतुरता आहे."





अली गोनीनेही इन्स्टाग्रामवर ग्रँड फिनालेतील फोटो शेअर करत लिहिले, "आम्ही 'लाफ्टर शेफ्स'चे विजेते ठरलो. माझ्या 'बिट्टी' जन्नतशिवाय हा प्रवास पूर्ण होऊच शकला नसता. या शोने मला एक जिवलग मैत्रीण दिली आणि आम्ही एकत्र विजेते झालो. सर्वांच्या प्रेमाबद्दल मनापासून आभार."


'लाफ्टर शेफ्स' (Laughter Chefs) या शोची सुरुवात २०२४ मध्ये तात्पुरता (Filler Show) कार्यक्रम म्हणून झाली होती. मात्र प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी (Makers) त्याचे पुढील सीझन्स (Seasons) आणण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या सीझनचे विजेते करण कुंद्रा आणि एल्विश यादव ठरले होते. तिसऱ्या सीझनला नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली होती. या पर्वात विवियन डीसेना (Vivian Dsena), ईशा सिंह (Eisha Singh), ईशा मालवीय (Isha Malviya), गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary), तेजस्वी प्रकाश आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) यांसारखे कलाकार सहभागी झाले होते.



मात्र कमी टीआरपी (TRP) मिळाल्यानंतर शोमध्ये मोठे बदल करण्यात आले. अनेक नवीन स्पर्धकांनी शो सोडला आणि मूळ (OG) टीमची पुन्हा एंट्री करण्यात आली. अखेर अली गोनी आणि जन्नत जुबैर यांनी दमदार कामगिरी करत 'लाफ्टर शेफ्स सीझन 3' चे विजेतेपद आपल्या नावावर केले.

Comments
Add Comment

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या