Archaeology Department on Gopalgad : शिवरायांचा ‘गोपाळगड’ खासगी विळख्यातून मुक्त होणार; पुरातत्त्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू

२२० रुपयांच्या बोलीवर झाला होता लिलाव



मुंबई : गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक ‘गोपाळगड’ खासगी विळख्यातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गडाच्या जागेवर खासगी मालकी हक्क सांगितला जात असल्याने पर्यटकांना होणारा त्रास, वाद आणि दमदाटीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पुरातत्त्व विभागाने या किल्ल्याच्या भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे शिवकालीन वैभवाचा साक्षीदार असलेला हा सागरी जलदुर्ग लवकरच पूर्णपणे शासनाच्या ताब्यात येणार असून इतिहासप्रेमी व पर्यटकांकडून या पावलाचे स्वागत केले जात आहे.


गुहागर तालुक्यातील अंजनवेल परिसरातील दाभोळ खाडीच्या मुखाशी वसलेला गोपाळगड हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक व दुर्गप्रेमी या ऐतिहासिक स्मारकाला भेट देतात. मात्र, किल्ल्याच्या अंतर्गत भूभागावर एका खासगी कुटुंबाने मालकी हक्क सांगितल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना सातत्याने गैरसोयींचा सामना करावा लागत होता.



काही दिवसांपूर्वी गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांशी खासगी मालकीचा दावा करणाऱ्या घटकांकडून वाद घालणे, डांबून ठेवणे आणि दडपशाही करण्याचे प्रकार घडले होते. याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर शिवतेज फाउंडेशनसह अनेक दुर्गप्रेमी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना किल्ल्याच्या मालकी हक्क व कायदेशीर स्थितीबाबत सखोल चौकशीचे निर्देश दिले होते.


१८७२ च्या ब्रिटिश सर्वेक्षणात हा किल्ला ७ एकर परिसरात पसरल्याची नोंद आहे. मात्र, १९६० नंतर महसूल नोंदींत ‘पडीक जमीन’ असा उल्लेख करून अवघ्या २२० रुपयांच्या बोलीवर या ऐतिहासिक वास्तूचा लिलाव करण्यात आला होता. या त्रुटीं विरोधात कायदेशीर लढा दिल्यानंतर २०१६ मध्ये न्यायालयाने याला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित केले होते. मात्र, तरीही खासगी दाव्यांमुळे पर्यटकांच्या मोफत व विनाअडथळा प्रवेशावर मर्यादा येत होत्या.



संवर्धनाचा मार्ग मोकळा


कायदेशीर नियमानुसार राज्य संरक्षित स्मारकांवर पर्यटकांना विनाअडथळा प्रवेश मिळणे बंधनकारक असते. या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुरातत्त्व विभागाने आता भूसंपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच गोपाळगड पूर्णपणे शासनाच्या अखत्यारीत येईल. त्यानंतर किल्ल्याची खचलेली तटबंदी, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, माहिती फलक, सुरक्षित प्रवेशमार्ग आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधांची कामे गतीने राबवणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात