Kargil Vijay Diwas : कारगिल ते ऑपरेशन सिंदूर! २७ वर्षांत भारतीय सैन्याची युद्धनीती कशी बदलली?
नवी दिल्ली : २६ जुलै हा दिवस भारतासाठी अभिमानाचा मानला जातो. याच दिवशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War) पाकिस्तानवर भारताने ऐतिहासिक विजय ...
ऑपरेशन कॅक्टस (1988) (Operation Cactus)
मालदीवमध्ये बंडखोरी मोडून काढण्यासाठी भारताने अवघ्या काही तासांत सैन्य पाठवत सरकारचे संरक्षण केले.
ऑपरेशन पवन (1987) (Operation Pawan)
श्रीलंकेत भारतीय शांतता सेनेने (IPKF) एलटीटीईविरुद्ध कारवाई केली.
ऑपरेशन राहत (2015) (Operation Rahat)
येमेनमधील युद्धादरम्यान भारताने हजारो भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांची सुरक्षित सुटका केली.
ऑपरेशन मैत्री (2015) (Operation Maitri)
नेपाळमधील भूकंपानंतर भारतीय सैन्याने बचाव, वैद्यकीय मदत आणि जीवनावश्यक साहित्य पोहोचवले.
सर्जिकल स्ट्राईक (2016) (Surgical Strike)
उरी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने लक्ष्यित कारवाई केली.
ऑपरेशन देवी शक्ती (2021) (Operation Devi Shakti)
अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिक आणि इतरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राबवलेले बचाव अभियान.
ऑपरेशन सिंदूर (2025) (Operation Sindoor)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यित हल्ले केल्याचे भारत सरकारने जाहीर केले.
ऑपरेशन ब्रह्मा (2025) (Operation Brahma)
म्यानमारमध्ये भूकंपानंतर भारताने मानवतावादी मदत, वैद्यकीय पथके आणि बचाव साहित्य पाठवत मदतकार्य केले.





