नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून देशाला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि निमलष्करी दल हाय अलर्टवर असून लाल किल्ल्यासह संवेदनशील भागांवर विशेष नजर ठेवली जात आहे.
दिल्लीच्या कानाकोपऱ्यात कडेकोट सुरक्षा :
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सीमावर्ती भाग, बाजारपेठा, मॉल, हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. हरियाणाला लागून असलेल्या आया नगर सीमेसह विविध प्रवेश मार्गांवर वाहनांची तपासणी सुरू आहे. यमुना खादर आणि इतर संवेदनशील भागांवर ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात आहे. संशयित व्यक्ती, वाहने आणि वस्तूंवर पोलिसांची विशेष नजर आहे. (Independence Day 2026)
गर्दी नियंत्रणासाठी मॉक ड्रिल :
उत्तर-पूर्व दिल्ली पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष मॉक ड्रिल घेतली. सुमारे २०० पोलिस कर्मचाऱ्यांनी या सरावात सहभाग घेतला. यावेळी वॉटर कॅनन, वज्र वाहने आणि अश्रुधुराच्या साधनांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. (Independence Day 2026)
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गुरुवार १३ ऑगस्ट रोजी ...
लाल किल्ल्याच्या परिसरात वाहतूक बदल :
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी ४ ते ११ वाजेपर्यंत लाल किल्ला आणि परिसरातील अनेक मार्ग सामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नेताजी सुभाष मार्ग, लोथियन रोड, निषादराज मार्ग, एस.पी. मुखर्जी मार्ग, एस्प्लेनेड रोड, किला घाट रोड आणि काही रिंग रोड परिसरात वाहतुकीवर निर्बंध असतील. १४ ऑगस्टच्या रात्री १० वाजल्यापासून १५ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजेपर्यंत जड वाहनांच्या वाहतुकीवरही निर्बंध राहणार आहेत. डीटीसी आणि इतर बसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून काही बसचे टर्मिनल रामलीला मैदान आणि तीस हजारी कोर्ट परिसरात हलवण्यात येणार आहेत. (Independence Day 2026)
हे मार्ग बंद राहणार :
नेताजी सुभाष मार्ग - दिल्ली गेट ते छत्ता रेल लोथियन रोड - जीपीओ दिल्ली ते छत्ता रेल एस.पी. मुखर्जी मार्ग - एच.सी. सेन मार्ग ते यमुना बाजार चौक चांदनी चौक रोड - फाउंटन चौक ते लाल किल्ला निषादराज मार्ग - रिंग रोड ते नेताजी सुभाष मार्ग एस्प्लेनेड रोड आणि नेताजी सुभाष मार्ग यांना जोडणारा लिंक रोड (Independence Day 2026)
वाहनचालकांनी तिलक मार्ग, मथुरा रोड, बहादूरशाह जफर मार्ग, सुभाष मार्ग, जवाहरलाल नेहरू मार्ग तसेच निजामुद्दीन ब्रिज ते आयएसबीटी ब्रिजदरम्यानच्या रिंग रोडवरील प्रवासाचे नियोजन करताना वाहतूक निर्बंध लक्षात घ्यावेत. पूर्व-पश्चिम दिशेने यमुना ओलांडण्यासाठी डीएनडी, एनएच-२४, विकास मार्ग, शाहदरा ब्रिज आणि वजीराबाद ब्रिज हे मार्ग उपलब्ध राहणार आहेत. (Independence Day 2026)
१ हजारांहून अधिक AI कॅमेऱ्यांची नजर :
लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात १ हजारांहून अधिक AI आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष कंट्रोल रूममधून या कॅमेऱ्यांवर देखरेख ठेवली जाणार आहे. संभाव्य हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि आसपास राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या २० हजारांहून अधिक नागरिकांची पडताळणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Independence Day 2026)
केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार मुंबई : सामाजिक चळवळ, संघटनबांधणी ...
१५ ते २० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात :
स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान दिल्ली पोलीस, ट्रॅफिक पोलीस, स्पेशल सेल, स्पेशल ब्रांच, निमलष्करी दल, एनएसजी आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे सुमारे १५ ते २० हजार जवान तैनात राहणार आहेत. लाल किल्ल्याबरोबरच यमुना खादर परिसरातही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Independence Day 2026)
पतंग उडवण्यावरही निर्बंध :
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील काही भागांमध्ये पतंग तसेच इतर हवाई वस्तू उडवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष परवानगीशिवाय अशा वस्तू उडवण्यास मनाई असून हे आदेश १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. (Independence Day 2026)
लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचा भव्य सोहळा :
लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह स्वागत करतील. त्यानंतर पंतप्रधान सलामी मंचाकडे रवाना होतील. तिन्ही सैन्यदल आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त तुकडीकडून त्यांना सलामी देण्यात येणार आहे. यानंतर पंतप्रधान सलामी गारदचे निरीक्षण करतील. या गारदमध्ये लष्कर, नौदल, वायुदल आणि दिल्ली पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश असेल. (Independence Day 2026)
तिरंगा फडकताच २१ तोफांची सलामी :
सलामी गारदच्या निरीक्षणानंतर पंतप्रधान लाल किल्ल्याच्या प्राचीरावर जातील. तेथे राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येईल. तिरंगा फडकताच २१ तोफांची सलामी देण्यात येणार आहे. यावेळी स्वदेशी १०५ मिमी लाइट फील्ड गनचा वापर करण्यात येणार आहे. तिरंग्याला राष्ट्रीय सलामी देताना लष्करी बँडकडून ‘वंदे मातरम्’ची धून वाजवली जाईल. त्यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन होईल. (Independence Day 2026)
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी :
५ हजार विशेष पाहुण्यांची उपस्थिती :
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे ५ हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. (Independence Day 2026)
लाल किल्ल्यावरील सोहळ्यात 'या' वस्तूंवर बंदी :
लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुरक्षा कारणास्तव काही वस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये कॅमेरा, दुर्बीण, छत्री, हँडबॅग, ब्रीफकेस, सिगारेट, लायटर, माचिस, टिफिन बॉक्स, पाण्याची बाटली आणि रिमोट असलेल्या कारच्या चाव्या यांचा समावेश आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावर जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि प्रतिबंधित वस्तू सोबत आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. (Independence Day 2026)






