Ind vs Zim : वैभव सूर्यवंशीचा वादळी खेळी ! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवले इतक्या धावांचे आव्हान

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स स्टेडियम येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसरा सामना जिंकून मालिका ३-० ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात आहे.



मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र झिम्बाब्वेच्या मुजरबानीने अभिषेक शर्माला दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद करत भारताला पहिला झटका दिला. त्यानंतर वैभवने ४९ चेंडूंमध्ये ८१ धावांची स्फोटक खेळी केली. भारतीय संघाने २० षटकात पाच बाद १९२ धावा केल्या.


 



 


वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी


वैभव सूर्यवंशीने या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. त्याने ४९ चेंडूंमध्ये ८१ धावांची स्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर त्याने ८१ धावांची खेळी केली. वैभवचं पहिलं शतक अवघ्या काही धावांनी हुकले आहे. मात्र त्याने या सामन्यात एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे. वैभवने आतापर्यंत भारतासाठी ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून या कालावधीत त्याने २११.३२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्या पाच सामन्यांत सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.



भारतीय संघ - वैभव सूर्यवंशी , अभिषेक शर्मा , ईशान किशन (यष्टीरक्षक) , श्रेयस अय्यर (कर्णधार) , तिलक वर्मा , रिंकू सिंग , सूर्यांश शेडगे , रवी बिश्नोई , यश ठाकूर , मयंक यादव , अशोक शर्मा


झिम्बाब्वे संघ - ब्रायन बेनेट , बेन करन , डायोन मायर्स , सिकंदर रझा (कर्णधार) , रायन बर्ल , वेस्ली माधेवेरे , तडीवानशे मरुमणी (यष्टीरक्षक) , ब्रॅड इव्हान्स , न्यूमन न्यामहुरी , वेलिंग्टन मसाकाद्झा , ब्लेसिंग मुझारबानी

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील