Shalarth ID Scam : बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तथा तत्कालीन शिक्षणाधिकारी ६६ वर्षीय शशिकांत भाऊराव हिंगोणीकर (Shashikant Hingonikar) यांना नाशिक पोलिसांच्या तपास पथकाने धुळे येथून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Shalarth ID Scam)
जम्मू : खराब हवामानामुळे आणि भूस्खलनामुळे सहा दिवसांपासून थांबलेली वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून म्हणजेच शनिवार, २५ जुलैपासून जम्मू येथून पुन्हा ...
नेमकं प्रकरण काय ?
नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत संबंधित शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील 459 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID Scam) तयार करून वेतन आणि थकबाकीची रक्कम उचलल्याचा आरोप आहे. पोलीस तपासानुसार, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोणताही वैध प्रस्ताव नसताना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे 1,200 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Shalarth ID Scam)
शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील मळ (Earwax) स्वच्छ करताना अनेकदा लोक नकळत ...
हिंगोणीकरला अटक का करण्यात आली ?
दरम्यान, शुक्रवारी माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथे सापळा रचून शशिकांत हिंगोणीकर (Shashikant Hingonikar) याला अटक करण्यात आली. तो सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेत (Jalgaon Zilla Parishad) माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना जळगाव जिल्ह्यातील एकूण २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे कोणतेही प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त नसतानाही त्याने बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Shalarth ID Scam)
भिवंडी : महाराष्ट्रातील गाजलेल्या टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात (TET paper Case) ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार ...
अधिक तपास पोलिसांकडून सुरु
गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शशिकांत हिंगोणीकर याचा शोध घेतला. तो धुळे येथे असल्याची माहिती तपास अधिकारी तथा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने धुळे येथे शोधमोहीम राबवून हिंगोणीकर याला ताब्यात घेतले. आरोपी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर याला नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) नेण्यात आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.






