भिवंडी : महाराष्ट्रातील गाजलेल्या टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात (TET paper Case) ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधील पटना येथून अटक करण्यात आली आहे. दीर्घ काळ फरार असलेल्या या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला अखेर यश आले असून, त्याला बिहारहून मुंबईमार्गे भिवंडीत आणले जात आहे.
या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, यापूर्वी अटक झालेल्या १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य सूत्रधाराच्या अटकेमुळे या बहुचर्चित घोटाळ्याच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. (TET paper Case)
- राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना नवे वळण, पंजाबच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता नवी दिल्ली : केंद्रातील ...
अवघ्या ८ हजारांत पेपर, दीड कोटींच्या सौद्याचा कट :
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार सोनू यांनी छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैशांचे आणि मालमत्तेचे आमिष दाखवून टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच मिळवला होता. धक्कादायक बाब म्हणजे प्रश्नपत्रिका बुटामध्ये लपवून छापखान्याबाहेर नेण्यात आल्या. अवघ्या हजार रुपयांत मिळवलेले हे पेपर तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा कट रचण्यात आला होता. (TET paper Case)
हे पेपर महाराष्ट्रातील भिवंडी आणि पुणे येथे विक्रीसाठी आणण्यात आले होते. मात्र, भिवंडी पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचत हा संपूर्ण रॅकेट उघडकीस आणला.
पटना येथे धाडसी कारवाई :
भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २८१/२०२६ अंतर्गत मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि विविध राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधत शोधमोहीम सुरू ठेवली. (TET paper Case)
अखेर बिहारमधील पटना येथे अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे परीक्षा गैरप्रकाराच्या तपासात महत्त्वाचा धागा हाती लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram) वर आणखी एक व्हिडीओ (Video) शेअर करत तरुणांचे, विशेषतः Gen ...
गंभीर कलमांखाली गुन्हा :
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ३१६(५), ६१(२) तसेच महाराष्ट्र विद्यापीठ व इतर विनिर्दिष्ट परीक्षा (अनुचित साधनांच्या वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९८२ आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांची प्रतिबंधक उपाययोजना) अधिनियम, २०२४ अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (TET paper Case)
मुख्य आरोपीच्या अटकेनंतर या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, आर्थिक व्यवहार कसे झाले आणि इतर राज्यांतील कनेक्शन काय आहेत, याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, बिहारमध्ये केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल ठाणे शहर पोलिसांचे राज्यभरातून कौतुक होत आहे. (TET paper Case)






