Supreme Court : लाठीचार्जविरोधातील दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २७ जुलैला सुनावणी

नवी दिल्ली: पेपर लीक प्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्ज आणि अत्याचाराच्या विरोधात दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारी, २७ जुलै रोजी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (Supreme Court)



ज्येष्ठ वकील श्याम दिवाण आणि गोपाल शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा गंभीर मुद्दा तातडीच्या सुनावणीसाठी उपस्थित केला. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयाच्या रजिस्ट्रीने याचिकांना अधिकृत नंबर दिल्याची माहिती वकिलांनी दिली. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवविरोधात विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर तीव्र आंदोलन पुकारले होते. यादरम्यान, २० जुलै रोजी दिल्लीत निघालेल्या 'संसद चलो' मार्चदरम्यान संसदेकडे आगेकूच करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी बळाचा वापर केला होता. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांच्या वापरामुळे अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या या हिंसक आणि लाठीचार्जच्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. यापूर्वी, केवळ एका साध्या निवेदनावरून सरन्यायाधीशांनी चुकीच्या वृत्तांकनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता याचिका अधिकृतपणे दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. (Neet Paper Leak)

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या