राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग
मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे नाव काढताच डोळ्यांसमोर काय येते? तासन् तास रांगेत ताटकळणारे रुग्ण, ‘डॉक्टर साहेब टेबलवर नाहीत’ अशी ऐकायला मिळणारी उत्तरे, औषधे बाहेरून विकत आणण्यासाठी हातात टेकवली जाणारी चिठ्ठी, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी! आजवर सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या सामान्य, गरीब रुग्णाच्या नशिबी आलेले हेच कडू वास्तव होते. मात्र, आता या पारंपरिक चित्राल पूर्णपणे छेद देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सप्रमाणेच आता राज्यातील ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या सर्व सरकारी दवाखान्यांना ‘स्टार रेटिंग’ दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या रेटिंगमध्ये रुग्णाचा अभिप्राय अत्यंत निर्णायक ठरणार आहे.(Mumbai News)
मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा जपानमधील आयाची नागोया येथे खेळली जाणार ...
सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी केला आहे. राज्यातील सर्व वयोगटांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि सरकारी आरोग्य यंत्रणेवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास पुन्हा दृढ व्हावा, या मुख्य उद्देशाने ही ‘स्टार रेटिंग प्रणाली’(Star rating system) अमलात आणली जात आहे. या नव्या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाचा अनुभव’. एखादा गरीब रुग्ण जेव्हा आजाराने त्रस्त होऊन सरकारी रुग्णालयात पोहचतो, तेव्हा त्याला तेथे सहानुभूतीची आणि आदरयुक्त वर्तनाची गरज असते. या निर्णयाअंतर्गत आता रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन आदरयुक्त होते का? रुग्णाला वैद्यकीय स्थितीनुसार पौष्टिक जेवण मिळाले का? कॉरिडॉर आणि स्वच्छतागृहे स्वच्छ होती का? रुग्णाला त्याचे आजारपण नीट समजावून सांगण्यात आले का? या आणि अशा अनेक मानवी घटकांवर आधारित रुग्णांचे अभिप्राय फोनद्वारे नोंदवले जाणार आहेत. या अभिप्रायावरच रुग्णालयाचे अर्धे भवितव्य आणि मानांकन अवलंबून असणार आहे.
नवी दिल्ली: भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे जाणवणारी जीवितहानी ही एक अत्यंत गंभीर चिंता बनली आहे. या समस्येवर मात ...
- सरकारी रुग्णालयांना शून्य ते पाच स्टार मिळवण्यासाठी एकूण १० निकषांच्या परीक्षेतून जावे लागणार आहे. प्रत्येक निकष पूर्ण केल्यास अर्धा स्टार (०.५) मिळणार असून, सर्व निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयालाच ‘फाइव्ह स्टार(Five Star)’चा बहुमान मिळेल. - हे १० निकष प्रामुख्याने पाच मुख्य स्तंभांवर आधारित आहेत. त्यानुसार, बायोमेट्रिक हजेरीनुसार किमान ८० टक्के डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक. रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा ८० टक्क्यांहून अधिक असणे आणि क्ष-किरण (एक्स-रे), ईसीजी व प्रयोगशाळा चाचण्या प्रत्यक्षात सुरू असणे. - बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि खाटांचा प्रत्यक्ष वापर (बेड ऑक्युपन्सी) योग्य प्रमाणात असणे. सुरक्षित प्रसूती आणि यशस्वी मोठ्या शस्त्रक्रियांची समाधानकारक संख्या. स्वच्छता, २४ तास पिण्याचे पाणी, स्वतंत्र कार्यरत शौचालये, ऑक्सिजन व बॅकअप वीजपुरवठा असणे अत्यावश्यक असणार आहे.
नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जलद सुनावणी होणार https://prahaar.in/2026/07/24/beloved-sisters-ineligible-final-list-prepared-after-e-kyc/ मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’सह इतर विविध स्पर्धा ...
- दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट अशा दोन फेऱ्यांमध्ये प्रत्येक रुग्णालयाचे स्टार रेटिंग जाहीर केले जाणार आहे. जे रुग्णालय उत्कृष्ट कामगिरी करून ४ किंवा त्याहून अधिक स्टार मिळवेल, त्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. यामुळे रुग्णालयांमध्ये आपापसांत निरोगी स्पर्धा निर्माण होईल आणि त्याचा फायदा उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना होईल. - आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ६२३ सरकारी रुग्णालये या प्रणालीच्या कक्षेत येणार आहेत. यामध्ये ३७३ ग्रामीण रुग्णालये, ७३ उपजिल्हा रुग्णालये (५० खाटा), ३३ उपजिल्हा रुग्णालये (१०० खाटा), २० जिल्हा रुग्णालये, २४ स्त्री रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, ७८ ट्रॉमा केअर सेंटर्स, २ संदर्भ सेवा रुग्णालये आणि १२ राज्य कामगार विमा रुग्णालयांचा समावेश आहे.






