मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पेरण्या लांबणीवर टाकाव्या लागल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची स्थिती विस्कळीत राहिल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या पाच ते सात दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना मोठा वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऊस पीक वगळता राज्यात २० जुलैअखेर सरासरी खरीप क्षेत्रापैकी ७४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. (Kharif sowing 2026)
मुंबई, गुजरातहून बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे सेवांना मुदतवाढ मुंबई : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आणि ...
राज्यातील सरासरी १४४.३६ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १०६.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा १ जून ते २० जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ४२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पेरणीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात ८८ टक्के पेरणी पूर्ण झाली होती, तर यंदा ही आकडेवारी ७४ टक्क्यांवर पोहोचली आहे. (monsoon 2026)
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर ठाणे ते कल्याण दरम्यान ...
विभागनिहाय पाहिल्यास अमरावती विभागात सर्वाधिक ८९ टक्के पेरणी झाली असून छत्रपती संभाजीनगर विभागात ७९ टक्के, नाशिक विभागात ७८ टक्के आणि लातूर विभागात ७७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागात ६३ टक्के, पुणे आणि नागपूर विभागात प्रत्येकी ६१ टक्के पेरणी झाली असून कोकण विभागात केवळ १५ टक्के पेरणी झाली आहे.सोयाबीन पिकाच्या लागवडीत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून ११३ टक्के पेरणी झाली आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ८७ टक्के सोयाबीनची लागवड झाली आहे. अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ८८ टक्के, तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ७० टक्के सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे.
वॉशिंग्टन : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत कठोर आणि मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. ...
तूर पिकाच्या पेरणीत नाशिक विभाग आघाडीवर असून येथे १२१ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ९१ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८६ टक्के, कोल्हापूर विभागात ८३ टक्के, नागपूर विभागात ७८ टक्के, पुणे विभागात ६२ टक्के आणि लातूर विभागात ५७ टक्के तुरीची पेरणी झाली आहे. मक्याच्या लागवडीत अमरावती विभागाने सर्वाधिक १४२ टक्क्यांचा टप्पा गाठला असून नाशिक विभागात १२८ टक्के, कोल्हापूर विभागात १०० टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ९४ टक्के, पुणे विभागात ८८ टक्के, नागपूर विभागात ८५ टक्के आणि लातूर विभागात ४२ टक्के मका पेरणी पूर्ण झाली आहे. समाधानकारक पावसामुळे आगामी काही दिवसांत उर्वरित क्षेत्रातील पेरण्याही पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.




