Judoka Tulika Maan : ज्युदोपटू तुलिका मानचे 'नाडा'कडून तात्पुरते निलंबन

नवी दिल्ली : भारताची आघाडीची ज्युदोपटू तुलिका मान हिला 'नाडा'च्या (National Anti-Doping Agency) नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने तात्पुरत्या निलंबनाची (प्रोव्हिजनल सस्पेंशन) कारवाई केली आहे. लोकेशन किंवा वास्तव्याची माहिती देण्यास वारंवार अपयशी ठरल्यामुळे तिच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.खेळाडूने नॅशनल अँटी-डोपिंग रूल्स २०२१ मधील कलम २.४ चे उल्लंघन केल्याचा संशय असल्याचे 'नाडा'ने खेळाडूला पाठवलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. रजिस्टर्ड टेस्टिंग पूलमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी आपल्या वास्तव्याची अचूक माहिती देणे बंधनकारक असते, ज्यामध्ये ती अपयशी ठरली आहे.



'नाडा'च्या नियमांनुसार या प्रकरणाची पुढील कारवाई पार पाडली जाईल. 'नाडा'ने स्पष्ट केले की, तुलिका मान सतत रजिस्टर्ड टेस्टिंग पूलचा भाग राहिली असून, १६ डिसेंबर २०२३ आणि २२ जानेवारी २०२६ रोजी पाठवलेल्या ई-मेलद्वारे तिला 'ॲ'डम्स' प्रणालीवर वास्तव्याची अचूक माहिती वेळच्या वेळी सादर करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. खेळाडूने दिलेल्या वेळेत आणि ठिकाणी तिचा डॉप नमुना गोळा करण्यासाठी डोपिंग कंट्रोल अधिकारी पाठवण्यात आले होते. मात्र, ठरवलेल्या दोन वेगवेगळ्या चाचणी सत्रांच्या वेळी तुलिका मान तिथे अनुपस्थित असल्याचे आढळून आले. 'नाडा'ने १० ऑक्टोबर २०२५ रोजी खेळाडूला याची माहिती दिली आणि २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ही चुक अधिकृतपणे नोंदवली गेली. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी तुलिकेला याबाबत कळवण्यात आले आणि २२ मे २०२६ रोजी ही चूक अधिकृतपणे रेकॉर्ड करण्यात आली. त्यानंतर १९ जून २०२६ रोजी 'नाडा'ने या अधिसूचनेत एक दुरुस्तीपत्रक जारी केले होते.



जागतिक अँटी-डोपिंग कोड आणि राष्ट्रीय अँटी-डोपिंग नियमांनुसार, १२ महिन्यांच्या कालावधीत लोकेशन न देण्याच्या किंवा चाचणी चुकवण्याच्या एकूण तीन चुका झाल्यास ते अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन मानले जाते. तुलिका मानचे प्रकरण कलम २.४ च्या कक्षेत येत असल्याचा आरोप करत 'नाडा'ने शिस्तभंगाच्या कारवाईचा निकाल लागेपर्यंत तिला तात्पुरते निलंबित केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तोंडावर भारतीय ज्युदोसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या +७८ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकणारी तुलिका मान ग्लास्गो स्पर्धेसाठी भारताची सर्वात प्रबळ पदक दावेदार मानली जात होती. भारतीय ज्युदो संघाची मोहीम ३१ जुलैपासून सुरू होणार असून, हा संघ २७ जुलै रोजी ग्लास्गोसाठी रवाना होणार आहे. (Judoka Tulika Maan)

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची