मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमधील ‘स्टॅटिक’ आणि ‘डायनॅमिक’ फाइल्सच्या कॉम्प्रेशनच्या तांत्रिक कामामुळे आरक्षण सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई पीआरएस प्रणाली २५ जुलै २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजल्यापासून २६ जुलै २०२६ रोजी पहाटे ३.१५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
नवी दिल्ली: पेपर लीक प्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्ज ...
या कालावधीत प्रवासी आरक्षण सेवा, कोचशी संबंधित परतावा सेवा, आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, परतावा खिडक्या आणि परतावा टर्मिनल यांसारख्या सुविधा उपलब्ध राहणार नाहीत. तसेच मुंबई पीआरएस अंतर्गत येणाऱ्या गाड्यांसाठी इंटरनेटद्वारे ऑनलाइन आरक्षण सुविधाही बंद राहणार आहे.
वॉशिंग्टन : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत कठोर आणि मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. ...
मात्र, विद्यमान रेल्वे परतावा नियमांनुसार प्रवाशांना परताव्यासाठी टीडीआर जारी करण्यात येईल. रेल्वे प्रशासनाने या तांत्रिक देखभाल कामासाठी प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, प्रवाशांनी आरक्षण किंवा इतर सेवांचा वापर करताना या वेळेची नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.






