IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपवत अखेर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ३ सामन्यांच्या या टी-20 मालिकेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं आहे.


जरी ही मालिका अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड होस्ट करत असली, तरी सुरक्षेच्या आणि इतर कारणांमुळे मालिकेतील सर्व सामने भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतच खेळवले जाणार आहेत. या मालिकेमुळे क्रिकेटप्रेमींना एका नव्या आणि युवा भारतीय संघाची झलक पाहायला मिळणार आहे.



वेळापत्रक आणि ठिकाण


अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, तिन्ही सामने दिल्लीच्या सुप्रसिद्ध अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील:





  • पहिला टी-20 सामना: १३ सप्टेंबर २०२६ (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)




  • दुसरा टी-20 सामना: १५ सप्टेंबर २०२६ (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)




  • तिसरा टी-20 सामना: १७ सप्टेंबर २०२६ (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)





युवा खेळाडूंना सुवर्णसंधी


या मालिकेचे नेतृत्व श्रेयस अय्यरच्या हाताों असणार असून, संघातील युवा खेळाडूंच्या सहभागामुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. विशेषतः, अवघ्या १५ वर्षांचा युवा आणि धडाडीचा खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) या मालिकेत पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.


भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. यानंतर, आगामी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेची (Asian Games 2026) तयारी म्हणून बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेची घोषणा केली आहे. २४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दिल्लीतील या थरारक सामन्यांचा आनंद घेण्यासाठी चाहते पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

Comments
Add Comment

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज