Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गांगुली कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारी पत्रं त्यांच्या निवासस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गांगुलीची पर्सनल सेक्रेटरी तानिया भट्टाचार्य यांनी ठाकुरपुकुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


तानिया भट्टाचार्य यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून एका अनोळखी व्यक्तीकडून सौरव गांगुलीविरोधात (Sourav Ganguly) आक्षेपार्ह आणि अपमानास्पद मजकूर असलेली पत्रं येत होती. सुरुवातीला या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. सौरव गांगुलीबद्दल नाराजी असलेली एखादी व्यक्ती अशा प्रकारे पत्रं पाठवत असावी, असा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला.



‘दादा’ आणि डोनाच्या नावाने आली दोन पत्रं :


मात्र, अलीकडेच परिस्थिती अधिक गंभीर झाली. सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्यांची पत्नी डोना गांगुली यांच्या नावाने दोन धमकीची पत्रं प्राप्त झाली. या पत्रांमध्ये दोघांविरोधात द्वेषपूर्ण आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर सौरव गांगुली, डोना गांगुली तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गांगुली (Sourav Ganguly) कुटुंबीय आणि त्यांच्या स्टाफच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.



‘टीका आणि द्वेषाच्या पुढे आता सुरक्षेचा प्रश्न’ :


या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ टीका किंवा वैयक्तिक नाराजीपुरता हा प्रकार मर्यादित राहिलेला नसून, आता थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. (Sourav Ganguly) सौरव गांगुली, डोना गांगुली आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणीही पोलिसांकडे करण्यात आली आहे.



कुरिअरद्वारे पाठवली धमकीची पत्रं :


समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही पत्रं कुरिअरच्या माध्यमातून सौरव गांगुली यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली. पत्रांवर पाठवणाऱ्याचे नाव अरुण कुमार असे नमूद करण्यात आले असून, तो बेलघरिया येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या पत्रांचा नेमका स्रोत कोणता, ती पाठवणारी व्यक्ती कोण आहे आणि धमकीमागील उद्देश काय आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पत्रातील मजकूर, कुरिअरची माहिती आणि संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीचा तपास केला जात आहे. (Sourav Ganguly)



पोलिसांच्या तपासाकडे लक्ष :


सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे भारतीय क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असून, क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही ते विविध प्रशासकीय आणि क्रीडा क्षेत्रातील भूमिकांमुळे चर्चेत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने आलेल्या धमकीच्या पत्रांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप धमकी देणाऱ्या व्यक्तीची अधिकृत ओळख किंवा धमकीमागील कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातून या पत्रांमागचे नेमके सत्य समोर येण्याची शक्यता आहे. (Sourav Ganguly)

Comments
Add Comment

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी