Thursday, July 23, 2026

Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागात २५४ अधिकाऱ्यांची भरती

Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागात २५४ अधिकाऱ्यांची भरती

मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन आकृतिबंध लागू; किनारपट्टीच्या विकासाला मिळणार अधिक गती

मुंबई : राज्याचा मत्स्यव्यवसाय विभाग अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. विभागासाठी नवीन आकृतिबंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क पदांची भरती केली जाणार असून, त्याची जाहिरात काढण्यात आली आहे.

मत्स्य विभागाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे नवीन आकृतिबंधाची प्रभावी अंमलबजावणी होत असून, यामुळे विभागाच्या एकंदरीत कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या पदभरतीमुळे राज्यातील २५४ मत्स्यविज्ञान पदवीधरांना शासकीय सेवेत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित शासकीय योजनांची अंमलबजावणी, मत्स्य संवर्धन, किनारपट्टी भागातील विकासकामे आणि स्थानिक मच्छीमारांना तांत्रिक मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे करणे आता शक्य होणार आहे.

मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे लागू झालेल्या या निर्णयामुळे प्रशासकीय कामांना गती मिळण्यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर मत्स्यव्यवसाय विभागाचे कामकाज अधिक गतिमान आणि परिणामकारक होईल. तसेच, किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा