मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणार्या विहार तुळशी, तानसा या तलावांपाठोपाठ मोडकसागर तलावही गुरुवारी रात्री २ वाजता ओसंडून भरुन वाहू लागले. त्यामुळे एकूण सात तलावांपैकी तीन तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी खुशखबर असली तरी मुंबईला ६० टक्क्यांहून अधिक पाणी पुरवठा करणार्या भातसा तलावांमध्ये ६५ टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे.
मुसळधार पावसामुळे बुधवारी तानसा तलाव भरले. त्यानंतर गुरुवारी रात्री मोडक सागर तलावही (Lake) भरले. दरवर्षी मोडक सागर (Modak Sagar) तलाव प्रथम भरते आणि त्यानंतर तानसा तलाव भरले जाते. परंतु मागील वर्षांपासून ही प्रथा खंडित झाली आहे. मागील वर्षी तानसा प्रथम आणि त्यानंतर मोडक सागर धरण भरले होते. याही वर्षी तानसा प्रथम आणि दुसऱ्या दिवशी मोडक सागर धरण भरले आहे.
मुंबई : मुंबईत (Mumbai) कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) परिणाम आता जलाशयांतील (Reservoirs) पाणीसाठ्यावर (Water Stock) स्पष्टपणे दिसून येत आहे. बुधवार, दिनांक ...
मुंबईला पाणी पुरवठा करणार्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ४१०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मात्र, २३ जुलै २०२६ रोजी यासर्व तलावांमध्ये १०लाख ०९ हजार ४३२ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही १८ ते १८टक्के पाणी साठा कमी आहे.
मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव गुरुवारी रात्री २.०७ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. यंदाच्या मोसमातील भरून वाहू लागलेला मोडक-सागर तलाव हा चौथा तलाव आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे.
