- भारताने पहिल्या टी-२० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्माला मिळाली संधी
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या नाणेफेकीसोबतच अय्यरने भारतीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (IND vs ZIM 1st T20I)
श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा विक्रम :
सलग सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकणारे भारतीय टी-२० कर्णधार:
- श्रेयस अय्यर – ८ वेळा (जून २०२६ ते जुलै २०२६) - महेंद्रसिंह धोनी – ७ वेळा (मे २०१० ते फेब्रुवारी २०१२) - विराट कोहली – ६ वेळा (ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०१९) - रोहित शर्मा – ५ वेळा (फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२२) - महेंद्रसिंह धोनी – ५ वेळा (सप्टेंबर २००७) (IND vs ZIM 1st T20I)
ZIM vs IND : भारत (India) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) यांच्यात आज (२३ जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे पहिला टी-२० (T20) सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय युवा ...
अशोक शर्माला मिळाली पदार्पणाची संधी :
या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा याला भारतीय संघाकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली. आयपीएलमधील प्रभावी कामगिरीनंतर त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली होती. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आलेला अशोक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी छाप पाडतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (IND vs ZIM 1st T20I)
भारताची प्लेइंग इलेव्हन :
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव. (IND vs ZIM 1st T20I)
टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून ...
झिम्बाब्वेची प्लेइंग इलेव्हन :
झिम्बाब्वे दौऱ्याची विजयी सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे. (IND vs ZIM 1st T20I)




