Pune Crime : मित्रांशी गप्पा मारत उभा होता... तितक्यात मागून 7 जण आले अन् अवघ्या 30 सेकंदांत 30 वार; पुण्यातील कात्रज हादरले!

पुणे: पुण्यातील कात्रज तलाव परिसरात सोमवारी रात्री एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात अवघ्या 30 सेकंदांत 7 अल्पवयीन मुलांनी मिळून या तरुणावर कोयत्याने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा आपल्या मित्रासोबत कात्रज तलावाजवळील एका हॉटेलसमोर उभा होता. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या 7 जणांच्या टोळीने त्याला घेरले. आरोपींनी कोणतीही चर्चा न करता त्याच्यावर धारदार कोयत्याने सलग वार केले. डोके, चेहरा आणि छातीवर गंभीर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्थानिकांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.


प्राथमिक तपासात मृत मुलाविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा एका अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाशी वाद झाला होता. त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ही हत्या आधीच नियोजन करून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात आणत असताना मृत मुलाच्या आईने संतापाच्या भरात त्याच्यावर धाव घेत चपलेने मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आरोपींना पोलिसांच्या वाहनावर बसवून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


या घटनेनंतर पुण्यात अल्पवयीनांकडून वाढणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.


Comments
Add Comment

Pune news : पुणेकरांच्या खिशाला झळ! रिक्षा भाडेवाढीसह ई-रिक्षा आणि शेअर रिक्षेबाबत मोठे निर्णय

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची तडकाफडकी बदली

- अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

Gadchiroli : गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रम शाळेचा परवाना रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; पुढील 3 तासांसाठी हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा