- अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली केली आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Annasaheb Patil Mahamandal)
महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज आणि व्याज परताव्याचा लाभ दिला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून अनेक गरजू तरुणांचे मंजूर झालेले ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’ आणि कर्ज मंजुरीचे 'एलओआय' अचानक रद्द करण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. यामुळे तरुण उद्योजकांमध्ये महामंडळाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी पसरली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी होणार मुंबई : गडचिरोलीतील आश्रमशाळेतील ...
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकताच राज्यातील पाच जिल्ह्यांचा दौरा केला असता, अनेक तरुणांनी देशमुख यांच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या. मंजूर कर्ज आणि योजनांचा लाभ अचानक थांबविल्याचा आरोप त्यांनी केला. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नरेंद्र पाटील यांनी प्रथम मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देशमुख यांच्या कारभाराचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. ( Annasaheb Patil Development Corporation )
नरेंद्र पाटील यांचे गंभीर आरोप
नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महामंडळाच्या योजनांसाठी राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये निश्चित केलेली असताना, देशमुख यांनी स्वतःच्या अधिकारात ही अट सहा लाख रुपये केल्याचा आरोप पाटील यांनी केला. शासकीय नियमांचे उल्लंघन करून उत्पन्नाची मर्यादा कमी केल्यामुळे देशमुख हे 'मराठा द्वेषी' असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता.