Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर करणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. जळगाव शहरात थकबाकीपोटी स्मार्ट मीटरमधून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही आकडा टाकून अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या आणखी दोन ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगाव शहरातील नितीन साहित्यानगर (Nitin Sahityanagar) आणि सुप्रीम कॉलनी (Supreme Colony) परिसरात महावितरणच्या पथकाने केलेल्या तपासणीत हे दोन्ही प्रकार समोर आले. थकबाकी न भरता अधिकृत वीज जोडणी बंद असतानाही वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज वापरल्याचे तपासणीत आढळले.
Jalgaon : पैसे आणि दागिने चोर पळवतो अशी आपली समजूत असेल तर थांबा ! कारण जळगाव जिल्ह्यात चक्क चोरट्याने बसच पळवली आहे. जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या ...
वीज वाहिनीवर आकडा टाकला अन्...
नितीन साहित्यानगर येथील संजय भगवान महाजन यांच्या वीज जोडणीचा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, त्यांनी घराशेजारील लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृतपणे वीजपुरवठा (Unauthorized electricity supply) सुरू केला. या प्रकरणात सुमारे २ हजार १२० रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणच्या तपासणीत समोर आले. तर दुसऱ्या घटनेत सुप्रीम कॉलनीतील रहिवासी अकिब शाह अब्दुल रहमान शाह यांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी स्मार्ट मीटरद्वारे खंडित करण्यात आला होता. मात्र, त्यांनीही अधिकृत वीज जोडणी बंद असताना वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज वापरल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या प्रकरणात सुमारे १ हजार २३० रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणने नमूद केले आहे.
Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या विक्रेत्यांवर ...
महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल
महावितरणचे सहायक अभियंता विशाल नेमाडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्यातील कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात(Zilhapeth Police Station) ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, यापूर्वी शुक्रवारी अशाच प्रकारच्या तीन ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी दोन प्रकरणे समोर आल्याने स्मार्ट मीटर बसविल्यानंतरही अनधिकृत जोडणी करून वीज वापरण्याचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून ...
वीजचोरीप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार
दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी परस्पर जोडणी करून वीज वापरू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. अनधिकृतपणे वीज जोडणी केल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहकाविरोधात वीजचोरीप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून अधिकृत वीजपुरवठा सुरू करून घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.