Nashik News : बनावट पावत्या अन् बिले...२७ बँकाना दीड काेटींचा गंडा, एक ताब्यात

Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहर बँक असोसिएशन (‘न्युबा’) अंतर्गत जिल्ह्यातील २७ बँकांच्या संचालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष परिषदेच्या नावाखाली काेट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


नाशिक शहर बँक असोसिएशनने (‘न्युबा’) डिसेंबर २०२५ मध्ये श्रीनगर (Srinagar) येथे एका विशेष परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी राहुल दीपक रेवाळे (Rahul Deepak Revale) याच्या ‘दीपक हॉलिडेज’ला (Deepak Holidays) सोपवली होती. यामध्ये नाशिकमधील २७ बँकांनी नोंदणी करत सुमारे ४०० जणांच्या निवास, खाणपाण आणि प्रवासाचा एक काेटी ६४ लाखांचा खर्च रेवाळेकडे सुपूर्द केला होता. मात्र इराण - इस्त्रायल - अमेरिका या युद्धांबाबत सांगत आंतरराष्ट्रीय तणावामुळे श्रीनगरमध्ये परिषद घेणे सुरक्षित नाही,” असे कारण पुढे करत त्याने ही परिषद पुढे ढकलली.



बनावट पावत्या अन् बिले


रेवाळे याने नंतर, ‘न्युबा’च्या संचालक मंडळाला अंधारात ठेवण्यासाठी फसवणूक केली. रेवाळे हॉटेल आणि ट्रॅव्हल्स बुकिंग झाल्याचे भासवणाऱ्या बनावट पावत्या आणि बिले तयार करून ती असोसिएशनला दाखवली. मात्र प्रत्यक्षात कोणतेही बुकिंग त्याने केले नाही. ​प्राथमिक चौकशीत संशयित रेवाळे याने न्युबाकडून घेतलेली दीड काेटी रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी इतरत्र गुंतविल्याची कबुली दिली आहे. हे पैसे त्याने युको बँकेच्या खात्यावर आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे स्वीकारले होते.



गंगापूर पोलिसांकडून तपास सुरु


फसवणूक उघडकीस आल्यानंतर, त्याने हे पैसे लवकरच परत करू असे ‘बाँड पेपर’ वर लिहून दिले आहे. मात्र, बनावट पावत्यांचा खेळ करून बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान, मुंबईनाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) तपासानंतर या प्रकरणाचा ताबा आता गंगापूर पोलिसांकडे (Gangapur Police) देण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे गुन्ह्याचा तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

Comments
Add Comment

Nashik : १,३८० ग्रामपंचायतींमध्ये ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान ! ३१ मार्चपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश; १ एप्रिलपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी

Nashik : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक

Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

मुंबई : संगीतप्रेमी रसिकांसाठी मुंबईत तीन दिवसीय ‘गायन वादन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र

Nashik : अन्न भेसळीवर प्रशासनाचा पंचवटीत दणका; सणासुदीआधी तीन लाखांचा साठा जप्त

Nashik : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध

अजित आगरकर निवड समितीवरून गेले तर गिलच्या टीमचं काय होणार? वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी नवा पेच

भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलच्या

Nashik : नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, प्रभावी दस्तऐवजीकरण करा, आयुष प्रसाद यांचे आवाहन

Nashik : प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी प्रत्येक विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून

Short Circuit : लालबागच्या राजाच्या मंडपात मुखदर्शनाच्या रांगेत शॉर्टसर्किट; भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण