मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर-पंढरपूरदरम्यान दोन आषाढी विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या 22 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत धावणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यकतेनुसार आणखी विशेष गाड्याही चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Central Railway's Ashadhi Special Train)
दादरहून 24 जुलैला विशेष गाडी :
गाडी क्रमांक 01045 ही विशेष गाडी 24 जुलै 2026 रोजी दुपारी 12.50 वाजता दादर स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.15 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (Central Railway's Ashadhi Special Train)
मुंबई : मध्य रेल्वेने उपनगरीय प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि गर्दीमुक्त करण्यासाठी सोमवारपासून १५ डब्यांच्या १० नवीन लोकल फेऱ्या सुरू करण्याचा ...
पंढरपूरहून 26 जुलैला परतीची सेवा :
गाडी क्रमांक 01046 ही विशेष गाडी 26 जुलै 2026 रोजी पहाटे 12.15 वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.45 वाजता दादर येथे पोहोचेल. (Central Railway's Ashadhi Special Train)
'या' स्थानकांवर थांबा :
या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि परिसरातील भाविकांना पंढरपूरला जाणे अधिक सोयीचे होणार आहे.
गाडीची संरचना :
या विशेष गाडीत प्रवाशांसाठी विविध श्रेणींची व्यवस्था करण्यात आली आहे. गाडीत एकूण 18 डबे असतील. त्यामध्ये—
2 वातानुकूलित तृतीय (AC 3 Tier) 10 शयनयान (Sleeper) 4 सामान्य द्वितीय श्रेणी 2 द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन
अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरक्षण सुरू :
या विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू झाले असून, प्रवासी देशभरातील सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुक करू शकतात. याशिवाय 'रेलवन' (RailOne) ॲपद्वारेही आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. (Central Railway's Ashadhi Special Train)
सभागृहातील कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) सभागृहाच्या कामकाज हे १८८८ च्या अधिनियमातील तरतुदीनुसार आणि प्रथा आणि ...
गर्दी वाढल्यास आणखी विशेष गाड्या :
आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची संख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
दरम्यान, विशेष गाड्यांच्या सर्व थांब्यांवरील वेळापत्रक आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी एनटीईएस (NTES) ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असताना मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्यांमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. (Central Railway's Ashadhi Special Train)






