नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने अचानक ओढ दिल्याने निर्माण झालेली चिंतेची स्थिती आता निवळण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यापासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून, देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीने भीषण रूप धारण केले असून, अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या ...
गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अनेक शहरांत उष्णता आणि दमटपणा वाढला होता. प्रत्यक्ष तापमानापेक्षा 'फिलिंग हॉट' (जास्त उकाडा) जाणवल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आता मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या प्रणालीमुळे समुद्रातील ओलावा मोठ्या प्रमाणात जमिनीच्या दिशेने सरकणार असून, ढगांची निर्मिती वाढणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा जो पट्टा हिमालयाच्या दिशेने सरकला होता, तो आता पुन्हा दक्षिणेकडे स्थिरावत असल्याने मध्य आणि मैदानी भागांत पावसाची स्थिती सुधारणार आहे.
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने व्यापक नियोजन केले असून, ...
ईशान्य भारतापासून सुरुवात मान्सूनच्या या नव्या टप्प्याची सुरुवात ईशान्य भारतापासून होणार असून, त्यानंतर पूर्व, मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाचा जोर वाढेल. काही भागांत मुसळधार सरी, तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे हवेतील दमटपणा कमी होऊन तापमानात घट होण्यास मदत होईल. यंदा जुलैमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने शेतीवर त्याचा परिणाम झाला होता. भात, सोयाबीन, कापूस आणि कडधान्यांच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुनरागमन करणारा हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरेल. मात्र, एका आठवड्याच्या पावसाने संपूर्ण हंगामातील तूट भरून निघणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडचा ...
ऑगस्टकडे शेतकऱ्यांचे लक्ष पावसाचा हंगाम समाधानकारक राहण्यासाठी ऑगस्ट महिन्यातही सातत्याने चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. तेव्हाच जलसाठे वाढतील आणि कृषी क्षेत्राला दिलासा मिळेल. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील काही दिवसांतील हवामानाच्या बदलांकडे लागले असून, मान्सूनच्या या सक्रियतेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.





