डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमध्ये अनेक नागरिक अडकले असून, किमान सहा जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नेपाळ लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाकडून या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. (Nepal Flood)
या बचाव मोहिमेत नेपाळ लष्कराचे सुमारे ७ हजार जवान, तर नेपाळ आर्म्ड पोलीस फोर्सचे (NAPF) सुमारे ४ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुरामुळे प्रभावित झालेल्या दुर्गम आणि डोंगराळ भागात बचाव पथकांना खराब हवामान, दरडी, चिखल आणि वाहतूक व्यवस्था खंडित झाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Nepal Flood)
सहा जलविद्युत प्रकल्पांवर बचावकार्य :
NAPF चे प्रवक्ते उपमहानिरीक्षक नेत्र बहादूर कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर त्रिशुली, अप्पर त्रिशुली-१, रसुवा हायड्रोपॉवर, त्रिशुली-३ए, चिलिमे खोला आणि लांगटांग हायड्रोपॉवर या सहा प्रकल्पांवर बचाव पथकांचे विशेष लक्ष आहे. या प्रकल्पांमध्ये नेमके किती लोक अडकले आहेत, याची अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार किमान ५०० जण अडकले असण्याची शक्यता आहे. ड्रोनसह उपलब्ध आधुनिक साधनांचा वापर करून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. (Nepal Flood)
https://www.prahaar.in/2026/08/30/mohan-bhagwat-religions-may-differ-but-humanity-is-one-mohan-bhagwats-message-of-unity-from-madison-square-garden/खराब हवामानामुळे बचावकार्याला ब्रेक :
सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत आहे. सकाळच्या सत्रात पावसामुळे काही काळ मोहीम थांबवावी लागली आणि दुपारी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. रसुवा जिल्ह्यातील धुन्चेपर्यंत चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. मात्र त्यापुढील भागात पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर हाच प्रमुख पर्याय उरला आहे. जलविद्युत प्रकल्पांच्या परिसरात मोठमोठे दगड, प्रचंड प्रमाणात साचलेला चिखल आणि गाळ यामुळे बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. (Nepal Flood)
१३ जवान बेपत्ता :
६ वर्षांच्या मुलीला ६० तासांनंतर जीवदान :
दरम्यान, रसुवा जिल्ह्यातील टिमुरे परिसरात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीची तब्बल ६० तासांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली. घर कोसळल्यानंतर चिखल आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या मुलीचा आवाज ऐकून NAPF जवानांनी तिचा शोध घेतला. या मुलीचे नाव मनीषा असल्याचे सांगण्यात आले असून, तिचे आई-वडील अद्याप बेपत्ता आहेत. जवळपास अडीच दिवस ढिगाऱ्याखाली राहूनही ती जिवंत सापडल्याने या बचावकार्याला आशेचा किरण मिळाला आहे. (Nepal Flood)
https://www.prahaar.in/2026/08/30/kurla-nehru-nagar-flood-prevention-%E2%82%B97-crore-embankment-to-prevent-waterlogging-in-kurla-easts-nehru-nagar/त्रिशुली-३ए बोगद्यात ड्रिलिंग मशीनचा वापर :
नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजाराम बस्नेत यांनी सांगितले की, प्रतिकूल हवामानामुळे बचाव पथकांना वारंवार आपली कार्यपद्धती बदलावी लागत आहे. त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे. पुराच्या पाण्यासोबत आलेला मोठ्या प्रमाणातील चिखल, गाळ आणि दगड बोगद्याच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर साचल्याने तो शोधण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Nepal Flood)
२०८ जणांना सुरक्षित स्थळी हलवले :
दरम्यान, शनिवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत नेपाळ लष्कराने रसुवा जिल्ह्यातून आणखी २०८ नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवले. यामध्ये ३८ चिनी नागरिक आणि ५ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. नेपाळमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीत बचावकार्य अद्याप सुरू असून, दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि सुरक्षा दलांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (Nepal Flood)
View this post on Instagram






