लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा हा निर्णय योग्यच ठरला. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. भारताला इंग्लंडची पहिली विकेट घेण्यासाठी १९२ धावांपर्यंत वाट पाहावी लागली. यावरून भारतीय गोलंदाजांची किती घाम निघाला हे दिसून येते. इंग्लंडने ५० षटकात ३ गडी गमावून ३८७ धावा केल्या. तसेच विजयासाठी ३८८ धावांचे आव्हान दिले आहे. आता हे आव्हान गाठण्याचे भारतीय फलंदाजांसमोर आव्हान आहे. या सामन्यात अनुभवी रोहित शर्मा(Rohit sharma) आणि विराट कोहली(Virat kohli) काय करतात याकडे लक्ष असणार आहे. हा सामना भारताने गमावला तर टी-२० नंतर वनडे मालिकाही भारत गमावेल. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल. इंग्लंडची लॉर्ड्सवरची सर्वाधिक वनडे धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडने भारताविरुद्ध याच मैदानात १९७५ मध्ये ४ विकेट गमवून ३३४ धावा केल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे.(Cricket News)
नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २० जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०:१५ वाजता संसद ...
इंग्लंडकडून बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी जबरदस्त सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने १९२ धावांची भागीदारी केली. जेकब बेथेल ९३ चेंडूत ९१ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर बेन डकेट आणि जो रूट यांची जोडी जमली. या जोडीनेही भारतीय गोलंदाजांचा दम काढला. या जोडीने ८० चेंडूत १०१ धावांची भागीदारी केली. या दरम्यान बेन डकेटने शतक ठोकले. तर १३५ चेंडूत १८ चौकार आणि १ षटकार मारत १४१ धावांवर बाद झाला. जो रूट एका बाजूने शांत आणि संयमी फलंदाजी करत होता. त्यानेही अर्धशतकी खेळी केली. कर्णधार हॅरी ब्रूक त्याची साथ फार काळ देऊ शकला नाही. १२ चेंडूत १४ धावांची खेळी करून बाद झाला.(India Cricket Team)
कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालय परिसरात देशातील पहिले भाषा संग्रहालय ‘शब्दलोक’ (म्युझियम ऑफ ...
भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी
भारताकडून पाच गोलंदाजांनी इंग्लंडसमोर गोलंदाजी केली. पण त्यात प्रसिद्ध कृष्णा आणि प्रिंस यादव वगळता एकही गोलंदाजाला यश मिळाले नाही. अर्शदीप सिंगने १० षटकात ७२ धावा दिल्या. तर गुरनूर ब्रार हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात ९७ धावा दिल्या. तर अक्षर पटेलने फिरकीच्या जोरावर काही अंशी इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याने १० षटकात एकही गडी बाद केला नाही, पण ६१ धावा दिल्या. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी प्रभावी ठरली. प्रसिद्ध कृष्णाने १० षटकात ६९ धावा दिल्या आणि दोन विकेट काढल्या. यात स्पेलमध्ये दोन षटके निर्धाव टाकली.






