मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे रविवार १९ जुलै २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा 'मेगा ब्लॉक' आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. (Mumbai Local)
मेन लाईन : विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेवर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत.
निवडक 'डाऊन' मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गिकेवर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावर पुन्हा ५व्या मार्गिकेवर वळवल्या जातील; परिणामी त्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. (Railway Update)
मुंबई ( प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या पथकाने कर्जत आणि लोणावळा दरम्यानचे दक्षिण-पूर्व डाऊन मार्ग आणि मध्य मार्ग यशस्वीरित्या पूर्ववत केले असून, अनेक ...
• गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्सप्रेस • गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्सप्रेस • गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस • गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस
निवडक 'अप' मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर 'अप जलद' मार्गिकेवर वळवल्या जातील आणि विद्याविहार येथे पुन्हा ६ व्या मार्गिकेवर वळवल्या जातील; परिणामी त्या आपल्या गंतव्य स्थानावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासाच्या तिकिटांचे दर आता वाढणार आहेत. ...
• गाडी क्रमांक 11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस • गाडी क्रमांक 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन • गाडी क्रमांक 12134 मंगळुरू -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस • गाडी क्रमांक 13201 राजगीर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस • गाडी क्रमांक 17221 काकीनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस • गाडी क्रमांक 12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस • गाडी क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस. • गाडी क्रमांक 12168 बनारस -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस • गाडी क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस • गाडी क्रमांक 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
ट्रान्स-हार्बर लाईन: ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत. (Sunday Mega Block)
ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.
पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.




