मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर)च्या माध्यमातून व्यापक आराखडा राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाकेअरच्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत यासंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (MahaCare)
मुख्यमंत्र्यांनी राज्यभर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित
कर्करोग उपचार व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले. निदानापासून उपचारापर्यंत प्रत्येक रुग्णाला समान आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी महाकेअरची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेसाठी उच्च क्षमतेचे मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्याचे निर्देशही दिले.
Rajasthan Teacher Suspended : संतापजनक कृत्य..! ५०० रुपये चोरीच्या संशयावरून विद्यार्थिनींना केलं विवस्त्र; VIDEO
सवाई माधोपूर : राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ५०० रुपये चोरी झाल्याच्या संशयावरून ...
बैठकीत नागपूरमध्ये 'नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट' या उपकंपनीची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच महाकेअरच्या कॉर्पस निधीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधी स्वीकारणे, कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, लेखापरीक्षक आणि कंपनी सचिवांची नियुक्ती तसेच विविध सल्लागार नेमण्यालाही मंजुरी देण्यात आली. ( Cancer Treatment)
या बैठकीत महाकेअर आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्यात तांत्रिक सहकार्याचा सामंजस्य करारही करण्यात आला. या सहकार्यामुळे राज्यातील कर्करोग उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. ( Tata Memorial Hospital)
Bay of Bengal Tragedy : बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या दोन बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती
ढाका/यांगून : म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट कोसळले आहे. बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या ...
महाकेअरच्या माध्यमातून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक आणि अमरावती येथे सर्वसमावेशक कर्करोग उपचार केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच मुंबई, रत्नागिरी, सातारा, बारामती, जळगाव, यवतमाळ, अंबाजोगाई, ठाणे आणि शिर्डी येथे निदान व डे-केअर केंद्रे सुरू करण्याची योजना आहे.
राज्यभर कर्करोग उपचार अधिक सुलभ, परवडणारे आणि दर्जेदार करण्यासाठी महाआरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून ही संपूर्ण योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.