Wednesday, August 5, 2026

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वधर्म समभावाचा प्रभावी संदेश देशभर पोहोचविल्याच्या पार्श्वभूमीवर, या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार आणि बौद्ध धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांचा मुंबईत आयोजित 'राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्या'त गौरव करण्यात आला. (Governor Jishnu Dev Varma)

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Governor Jishnu Dev Varma) यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने सचिवालय जिमखाना येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Sindhu Mahakumbh)

'विविधतेत एकता' अधिक मजबूत करण्याची गरज : अण्णा बनसोडे

यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवणे, विविध धर्म आणि पंथांमध्ये परस्पर विश्वास व संवाद वाढवणे ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय संस्कृतीतील 'विविधतेत एकता' हा विचार अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि विकास पोहोचवणे हीच खरी समाजसेवा असल्याचा विचार त्यांनी दिला. त्याच विचारांवर आम्ही आजही काम करत आहोत." (Sindhu Mahakumbh)

बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव :

सन्मान स्वीकारल्यानंतर इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांनी गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शांतता, समता आणि मानवतेच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. जगातील अनेक देश युद्धाच्या छायेत असताना भारताने सर्वधर्म समभाव, बंधुता आणि शांततेचा मार्ग स्वीकारून जगासमोर आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांनी परस्पर विश्वास आणि सौहार्द अधिक दृढ करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. (Sindhu Mahakumbh)

'भारत जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहे' : राज्यपाल

राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Governor Jishnu Dev Varma) यांनी आपल्या भाषणात भारताने जगाला शांतता, सहअस्तित्व आणि विकासाचा मार्ग दाखविल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर संघर्षाचे वातावरण असतानाही भारत विविधतेतून एकतेचा संदेश देत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा सन्मान केवळ दोन व्यक्तींचा नसून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा गौरव असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा हा सन्मान सोहळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. (Sindhu Mahakumbh)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >