Nandurbar : भरवस्तीत बिबट्याचा थरार! चार जणांवर हल्ला; चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थाने बिबट्याला घरातच कोंडले

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील होळ मोहिदा गावात थरारक घटना घडली आहे. भरवस्तीत बिबट्या शिरल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. भरवस्तीत अचानक बिबट्याने शिरकाव केल्याने सगळ्यांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे नागरिकांनी या बिबट्याला एका घरात कोंडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. (Nandurbar News)




नेमकं काय घडलं ?


होळ मोहिदा (Hol Mohida) गावात भरवस्तीत एका घरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण घटनेत एका ग्रामस्थाने दाखवलेले धाडस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Nandurbar News)




ग्रामस्थाने बिबट्याला घरातच कोंडले


स्वतः जखमी असतानाही त्यांनी चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता बिबट्याला घरातच कोंडून ठेवले. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, घरात शिरलेल्या बिबट्याचा थरारक व्हिडिओही समोर आला असून, तो अंगावर काटा आणण्यास पुरेसा आहे. बिबट्या (Leopard) घराच्या खोलीत दबा धरून बसल्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. (Nandurbar News)




बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश


घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर (Rescue operation) वन विभागाने घराच्या दरवाजासमोर पिंजरा लावून अत्यंत शिताफीने बिबट्याला जेरबंद केले. अखेर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात वन विभागाला यश आले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Nandurbar News)




मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय


रेस्क्यूदरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्न केला. होळ मोहिदा गावातील या घटनेमुळे पुन्हा एकदा मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय बनला आहे. बिबट्या नेमका गावात कसा आला, तो परिसरात आणखी बिबटे आहेत का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे