ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले आपले जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम गेली १९ वर्षे सातत्याने सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)
"ज्या भावनेने आपण घरातील कार्यक्रमाला उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते आणि समाजाचा विकास अधिक वेगाने होतो," असे शिंदे म्हणाले. यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका ४० वर्षीय तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. (Eknath Shinde)
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ...
'सुरेश गडा हे धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे शिवसैनिक' :
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या समाजसेवेचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, "धर्मवीर आनंद दिघे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून सुरेश गडा यांचे नाव कायम आदराने घेतले जाईल." त्यांनी हिंदीतही भावना व्यक्त करत, "चालीस साल से शिवसेना के साथ खड़ा, उसका नाम है सुरेश गडा," असे गौरवोद्गार काढले. (Eknath Shinde)
आषाढी बीजच्या शुभेच्छा :
आषाढी बीज हा कच्छी समाजाचा नववर्षाचा सण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी सर्व समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. मराठी समाजासाठी जसा गुढीपाडवा महत्त्वाचा आहे, तसाच कच्छी समाजासाठी आषाढी बीज हा नववर्षाचा प्रारंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde)
ठाण्यात विकासकामांचा वेग वाढणार :
ठाण्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देताना शिंदे यांनी मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगितले. अहमदाबाद-घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोस्टल रोडमार्गे मुंबईकडे वळवल्यानंतर ठाण्याची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Eknath Shinde)
पुरी (ओडिशा): सनातन धर्मातील सर्वात पवित्र आणि भव्य उत्सवांपैकी एक असलेल्या श्रीजगन्नाथ रथयात्रेला आज (१६ जुलै) रवि योगाच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ ...
व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य :
धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यापारी हिताच्या धोरणाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, व्यापारी सुरक्षित असतील तरच उद्योग-व्यवसाय वाढतो. व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)
आरोग्य सुविधांवरही भर :
साकेत परिसरातील त्रिमंदिराचा उल्लेख करत त्यांनी लवकरच कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती दिली. महावीर हॉस्पिटलसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविड काळात समाजाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची आठवण करून देत त्यांनी समाजाच्या एकजुटीचे कौतुक केले. (Eknath Shinde)
'ठाणेकरांशी माझं नातं राजकीय नाही, कौटुंबिक आहे' :
ठाणेकरांनी शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री होईपर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिंदे म्हणाले, "ठाणेकरांशी माझं नातं हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नसून ते कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं आहे." कार्यक्रमाला आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छी अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कच्छी समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. (Eknath Shinde)
📍 #ठाणे | कच्छी अस्मिता मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'कच्छी पगडी कोणा शिरे' या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कच्छी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना सन्मानित केले. ठाणे… pic.twitter.com/fPj8M2lYtP
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 15, 2026






