PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या १४ वर्षीय मुलीचा बारामतीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बारामती शहरातील रुई परिसरातील साई गणेश नगर येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी आई रागावल्यामुळे मुलगी घरातून निघून गेली होती. ती रात्री घरी परतली नाही. बराच शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने २५ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी बारामती पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता.तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान शहरातील एका पाच मजली इमारतीत मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी तपास केल्यानंतर पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले.



अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या गच्चीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले, तर मुलीची चप्पलही घटनास्थळी मिळाली. उपलब्ध तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे मुलीने इमारतीवरून उडी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमागे आई रागावल्याने आलेला राग हे प्राथमिक कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :