Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील होळ मोहिदा गावात थरारक घटना घडली आहे. भरवस्तीत बिबट्या शिरल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. भरवस्तीत अचानक बिबट्याने शिरकाव केल्याने सगळ्यांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे नागरिकांनी या बिबट्याला एका घरात कोंडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. (Nandurbar News)
पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल (वय २५) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (वय २०) हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. अन्न ...
नेमकं काय घडलं ?
होळ मोहिदा (Hol Mohida) गावात भरवस्तीत एका घरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण घटनेत एका ग्रामस्थाने दाखवलेले धाडस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Nandurbar News)
मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra - SIR) अभियानाला महाराष्ट्रात १० दिवसांची मुदतवाढ ...
ग्रामस्थाने बिबट्याला घरातच कोंडले
स्वतः जखमी असतानाही त्यांनी चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता बिबट्याला घरातच कोंडून ठेवले. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, घरात शिरलेल्या बिबट्याचा थरारक व्हिडिओही समोर आला असून, तो अंगावर काटा आणण्यास पुरेसा आहे. बिबट्या (Leopard) घराच्या खोलीत दबा धरून बसल्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. (Nandurbar News)
सामान्य माणूस असता तर एव्हाना कायद्याचा बडगा उगारला असता मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर त्यांच्या सुनेने केलेल्या गंभीर ...
बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर (Rescue operation) वन विभागाने घराच्या दरवाजासमोर पिंजरा लावून अत्यंत शिताफीने बिबट्याला जेरबंद केले. अखेर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात वन विभागाला यश आले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Nandurbar News)
Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये (Pimpalner) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २१ वर्षीय ...
मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय
रेस्क्यूदरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्न केला. होळ मोहिदा गावातील या घटनेमुळे पुन्हा एकदा मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय बनला आहे. बिबट्या नेमका गावात कसा आला, तो परिसरात आणखी बिबटे आहेत का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.






