Shivraj Motegaonkar : कोचिंग क्लास मालक शिवराज मोटेगावकरच्या जामीन अर्जाला सीबीआयचा विरोध

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट युजी २०२६ पेपर लीक प्रकरणात सीबीआयने विशेष न्यायालयात एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. लातूर येथील कोचिंग क्लासेसचे मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांने नीट परीक्षेची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी तब्बल ५ लाख रुपये दिल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. मोटेगावकर याच्या जामीन अर्जाला विरोध करताना सीबीआयने हा धक्कादायक खुलासा केला.



एनटीएच्या पॅनल सदस्याकडूनच पेपर लीक


सीबीआयने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हा एक मोठा कट होता. शिवराज मोटेगावकर यांनी सह-आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका मिळवली. धक्कादायक बाब म्हणजे, पी. व्ही. कुलकर्णी हे थेट राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या त्या पॅनलवर होते, ज्या पॅनलने नीटचा पेपर सेट केला होता. मोटेगावकर यांचा मुलगा कुलकर्णी यांच्याच केमिस्ट्री ट्युटोरियल्स या कोचिंग क्लासमध्ये शिकत होता. याच वर्गात हे प्रश्न पुरवण्यात आले होते.सीबीआयने स्पष्ट केले की, लीक झालेले प्रश्न मिळवण्यासाठी मोटेगावकर यांनी ५ लाख रुपये दिले होते. हे पैसे सीबीआयने आणखी एक आरोपी मनोज भगवानराव शिरुरे याच्या सांगण्यावरून जप्त केले आहेत.



मोबाईलमध्ये सापडले १३२ प्रश्न; १० दिवस आधीच पेपर लीक


तपासादरम्यान सीबीआयने मोटेगावकर यांचा मोबाईल जप्त केला होता, ज्याच्या फॉरेन्सिक तपासणीतून गुन्ह्याचे धागेदोरे हाती लागले. आरोपीच्या मोबाईलमध्ये एकूण ३६ फोटो सापडले, ज्यामध्ये ५ डुप्लिकेट फोटो होते. या फोटोंमध्ये १३२ केमिस्ट्रीचे प्रश्न होते जे हाताने लिहिले होते. जेव्हा सीबीआयने या प्रश्नांची तपासणी केली, तेव्हा त्यातील तब्बल १११ प्रश्न एनटीएच्या मास्टर प्रश्नसंचाशी जुळले. (Shivraj Motegaonkar )



१० दिवस आधीच कट


मोबाईलच्या मेटाडेटा तपासातून समोर आले की, ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल १० दिवस आधीच हे फोटो काढण्यात आले होते. हे सर्व प्रश्न खुद्द मोटेगावकर यांनीच लिहून घेतल्याचे सीबीआयने म्हटले आहे. (Neet Paper)



आतापर्यंत १३ आरोपींना अटक


नीट पेपर लीकच्या या मोठ्या रॅकेटमध्ये सीबीआयने आतापर्यंत पुणे, लातूर आणि इतर भागांतून १३ जणांना अटक केली असून, हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत पेपर लीक झाल्याचे आरोप झाले होते. वाढत्या वादामुळे अखेर १२ मे रोजी ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती. या पेपरफुटीचा केंद्रबिंदु महाराष्ट्रात असल्याने खळबळ उडाली होती. (Neet Paper Leak)

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम