Nitesh Rane : रामाच्या नावाने राजकारण बंद करा; संघभूमीवर जाऊन नाक घासा!

- संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मंत्री नितेश राणेंकडून समाचार


मुंबई : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis)  यांना लिहिलेल्या पत्राचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बोचऱ्या शब्दांत समाचार घेतला आहे. "रामाच्या नावाने राजकारण करणे आधी बंद करा आणि नागपुरात चाललाच आहात, तर संघभूमीवर नाक घासून आतापर्यंत केलेल्या पापांची माफी मागा," अशा शब्दांत राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.



राणे म्हणाले, "आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिताना आपण तर कहरच केला. प्रभू श्रीरामांच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचला. जे प्रभू श्रीराम सर्वांची सुरक्षा करतात, त्यांची सुरक्षा आपण केव्हापासून करायला लागला?" असा खोचक सवाल राणे यांनी केला. रामरक्षा पाठ असणे तर दूरच, पुस्तकात पाहूनही रामरक्षेची दोन पाने आपला नेता धड वाचू शकत नाही आणि निघाले देवेंद्रजींना सल्ले द्यायला... लाज वाटायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.


रामजन्मभूमी आंदोलनातील सहभागावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात कवडीचा सहभाग तुमचा नव्हता, ना उद्धव ठाकरे यांचा सहभाग होता. ज्या कार्यकर्त्यांनी लाठी, गोळ्या खाऊन तुमच्या आजच्या सहकारी काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलने केली आणि हा ऐतिहासिक लढा जिंकला, त्या अनेक पिढ्यांपैकी एक स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत. तिन्ही कारसेवांना उपस्थित राहणारे आमचे नेते देवेंद्रजी आहेत," असे राणे यांनी नमूद केले. ( Shiv Sena UBT)





डर्टी संजय राऊत


"रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून आता पुळका दाखवू नका. किमान रामाच्या नावाने राजकारण (Political) करू नका. नागपुरात चाललेच आहात, तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत केलेल्या पापांची माफी मागा... डर्टी संजय राऊत", असा सल्लाही मंत्री नितेश राणे यांनी दिला. (Sanjay Raut)

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून