Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले तरी संघटनात्मक पातळीवर कार्यकर्ते आणि बुथप्रमुखांनी यामध्ये यौगदान देण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य शासनाच्या गव्हर्नन्स प्रोसेस ...
मतदार यादी सखोल पुनरिक्षण मोहीमेचा आढावा
पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदार संघातील (Pathardi-Shevgaon Assembly Constituency) मतदार यादी सखोल पुनरिक्षण मोहीमेचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतला.आ.मोनिका राजळे (Monika Rajale), भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग (Dilip Bhalsing), विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांच्यासह या मोहीमेसाठी नियुक्त करण्यात आलेले पक्षाचे प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.
वर्धा : वर्धा (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून अत्यंत ...
अन् मतदार यादीतील घुसखोर उघडे पडले
उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले. आतापर्यत मतदार संघात १ लाख ७१ हजार अर्जाचे वितरण झाले आहे. आता अर्ज भरून घेण्याच्या कामाला गती द्यावी लागेल.सरकारी यंत्रणेच्या एक पाउल पुढे जावून संघटनात्मक स्तरावर अधिक काम करण्याचे आवाहन त्यांंनी केले. संपूर्ण देशातील २२ राज्यात ही मोहीम सुरू असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,या मोहीमेमुळे कोणत्याही मतदारावर अन्याय होणार नाही. दुबार मतदार आणि मतदार यादीत खोटी माहीती देवून नाव टाकलेल्या व्यक्तीची नाव कमी करण्याची संधी आहे. पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये मोहीम राबविल्यामुळे मतदार यादीतील घुसखोर उघडे पडले. निवडणूक प्रक्रीयेत गुंडगिरी दहशत करून अराजक निर्माण करण्याचे काम वर्षानुवर्ष सुरू होते. याद्यांचे पुर्नरिक्षण झाल्यामुळे ९१लाख मतदारांची नाव कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन शाळकरी ...
मतदार सखोल पुनरिक्षण मोहीमेचा फायदा भविष्यात दिसेल
पुढे ते म्हणाले की, मतदार यादीत २००२ पासून नावाचा समावेश असणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरील आपल्या गावात प्रभागात आणि बुथवर लक्ष केंद्रीत करून ही प्रक्रिया यशस्वी करण्याची जबाबदारी पदाधिकारी कार्यकर्ते आणि बुथ स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येकाची असल्याचे मंत्री विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. मतदार सखोल पुनरिक्षण मोहीमेचा फायदा तुम्हाला भविष्यात दिसेल. कारण ही मोहीम परत कधी होईल माहीत नाही त्यामुळे आताच गांभीर्यपुर्वक मोहीमेत योगदान देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.





