Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे. आता १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या या दुर्मिळ खगोलीय घटनेत चंद्र सूर्याला झाकून टाकणार असून, काही भागांत दिवसा काही मिनिटांसाठी अंधाराचे वातावरण निर्माण होणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने भारतीय नागरिकांना ते प्रत्यक्ष पाहता येणार नाही.हे खग्रास सूर्यग्रहण पूर्व ग्रीनलँड, पश्चिम आइसलँड, उत्तर स्पेन आणि पोर्तुगालच्या काही भागांत व्यवस्थित दिसणार आहे. या भागांतील सुमारे दीड कोटी लोकांना चंद्राने झाकलेला सूर्य पाहण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे. ग्रहणाच्या पूर्ण अवस्थेत सूर्य सुमारे दोन ते अडीच मिनिटे झाकला जाईल. हा कालावधी २०२४ मधील उत्तर अमेरिकेतील खग्रास सूर्यग्रहणापेक्षा कमी असला तरी खगोलप्रेमींसाठी ही घटना महत्त्वाची असणार आहे.



या ग्रहणाचे वैशिष्ट्य काय ?


या सूर्यग्रहणाच्या अवघ्या २४ तासांत पर्सिड उल्कावर्षाव (Perseid Meteor Shower) शिखरावर पोहोचणार आहे. त्यामुळे सूर्यग्रहणानंतर रात्री आकाशात उल्कांचा नेत्रदीपक वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे १२ ऑगस्ट हा दिवस खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास ठरणार आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील अनेक भागांत खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल, तर भारतासह अनेक आशियाई देशात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. (Solar Eclipse )



पुढच्या वर्षात सूर्यग्रहण कधी दिसणार ?


यानंतरचे खग्रास सूर्यग्रहण दोन ऑगस्ट २०२७ रोजी उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील काही भागांत दिसणार आहे. हे ग्रहण तब्बल सहा मिनिट २३ सेकंद टिकणार असल्याने ते या शतकातील सर्वात लांब खग्रास सूर्यग्रहणांपैकी एक असेल.(Solar Eclipse)

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू