Moshi incident : पुणे जिल्ह्यातील मोशी दुर्घटनेच्या ठिकाणी ७२ तासांनंतरही बचावकार्य सुरू

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला असून दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवती साचलेला प्रचंड मलबा हटवून सुरक्षित प्रवेशमार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय सेना, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनb (NDRF) आणि महापालिकेच्या विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी घटनास्थळी पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला. इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याबरोबरच मागील बाजूने सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.(Moshi Incident)



घटना घडून ७२ तासांहून अधिक कालावधी उलटला असला तरी प्रशासनाने आशा सोडलेली नाही. आत अडकलेल्या नागरिकांची अचूक माहिती मिळवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. बचावलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम अधिक केंद्रित करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांना धीर दिला. “प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहेत. धीर सोडू नका,” असा दिलासादायक संदेश त्यांनी दिला. तसेच नातेवाईकांच्या भोजन, निवास व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधित कंपनीला देण्यात आले.(Pune Incident)



या दुर्घटनेची गंभीर दखल घेत माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या तसेच अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.दुसरीकडे, या दुर्घटनेच्या कारणांबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, मुसळधार पावसामुळे संतृप्त झालेल्या घनकचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्याने इमारतीवर आडवा दाब निर्माण केल्याने इमारत उलटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण समजण्यासाठी सखोल जिओटेक्निकल आणि फॉरेन्सिक तपासणीची आवश्यकता असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांनीही कचरा डेपो व्यवस्थापनातील कथित हलगर्जीपणाबाबत गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.(Pune district)



एनडीआरएफची रणनीती


इमारतीच्या समोरील बाजूचा प्रवेशमार्ग पूर्णपणे बंद झाल्याने मागील बाजूने प्रवेश करण्यासाठी मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. सुरक्षित सुटका झालेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडकलेल्या व्यक्तींच्या संभाव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.



चौकशीची मागणी, खा. श्रीरंग बारणे यांची मागणी


एसआयटीमार्फत चौकशी करावी


दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी


मृत कामगाराच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्यावी


सुलभा उबाळे यांची मागणी


सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा


संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे


कचरा डेपो व्यवस्थापनाची स्वतंत्र चौकशी करावी

Comments
Add Comment

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात प्रचंड उलटफेर! आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की ऊन पडणार? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप