Pune Murder : शिक्रापुरात पोत्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटकडून खून

धक्कादायक! पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला; दोन्ही आरोपींना अटक


पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील शिक्रापूर (Shikrapur) येथील करंजेनगर परिसरात पोत्यात सापडलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाप्रकरणाचा अवघ्या काही तासांत पोलिसांनी छडा लावला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच मित्राचा गळा दाबून खून (Murder) केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून निर्जन झुडपात फेकल्याची कबुली दिली आहे.


२४ ते २६ जुलैदरम्यान ही घटना घडली. गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, रा. थेऊर, ता. हवेली) याचा खून करण्यात आला. २६ जुलै रोजी करंजेनगर येथील मोकळ्या मैदानातील झुडपात पोत्यात भरलेला मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. (Pune Crime)



मृताची ओळख पटवण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित केली आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. त्यानंतर मृताची ओळख गौरव उर्फ अक्षय वायकर अशी पटली. (Murder Case)


तपासात गौरव हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे (वय १९) आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत राहत असल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. (Pune Police)


चौकशीत मुकेशने अनैतिक संबंधाच्या संशयातून गौरवचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पत्नी जान्हवीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून करंजेनगर येथील झुडपात टाकल्याचेही उघड झाले. (Deathbody)


या प्रकरणी मयताची आई कांचन अशोक वायकर यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येमागील इतर कारणांचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.  (Arrest )

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०