मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, दि. १२ जुलै रोजी मेन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय लोकल सेवा वळविण्यात येणार असून, काही सेवा रद्दही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मेन मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगा ब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबत विद्याविहार येथे पुन्हा धीम्या मार्गावर येतील. तसेच घाटकोपरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल गाड्याही विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावरून धावतील.(CSMT)
मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात शुक्रवारी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने बसवरील नियंत्रण सुटून बसने सुमारे १४ वाहनांना धडक ...
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०, तर चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत मेगा ब्लॉक राहणार आहे. यामुळे सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल तसेच वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या अनेक हार्बर लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पनवेल, बेलापूर, वाशी, वांद्रे आणि गोरेगाव येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील अनेक सेवाही बंद राहतील.(Mega Block)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; 'भाडे के टट्टू'वर आक्षेप घेणाऱ्यांना संबोधले 'सुपारीबाज' मुंबई : राज्यातील बळीराजाला आतापर्यंतची सर्वात ...
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले असून, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांची दिलगिरीही व्यक्त केली आहे.




