Anil Ambani : अनिल अंबानी समूहाच्या कर्ज घोटाळ्याचा तपास वेगात

मुंबई : रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित बनावट (शेल) कंपन्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट कर्जे कशी मंजूर करण्यात आली, याचा तपास आता सक्तवसुली संचालनालय करत आहे. 'रिलायन्स होम फायनान्स' आणि 'रिलायन्स कमर्शियल फायनान्स'मधील १५,५४८ कोटी रुपयांच्या कथित अपहार प्रकरणी ईडीने आपल्या तपासाचा वेग वाढवला आहे.



तपासादरम्यान ईडीला 'मेसर्स ई-कॉम्प्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या संचालकाच्या घरी धाड टाकली असता, महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हे धागेदोरे रिलायन्स समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी जोडले गेलेले आहेत. विशेष म्हणजे, कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या या शेल कंपन्यांचे संचालक प्रत्यक्ष रिलायन्सचेच कर्मचारी किंवा निकटवर्तीय होते, जे समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कॅपिटल या प्रमुख कंपन्यांमधील अधिकारीच हाताळत होते.(Anil Ambani)



सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने ही कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत ४,५१० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापैकी ३,९२६ कोटी रुपयांच्या जप्तीवर सक्षम प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकरणी रिलायन्स कॅपिटलचे माजी संचालक अमिताभ झुनझुनवाला आणि माजी सीएफओ अमित बापना यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या घोटाळ्यात, रिलायन्सच्या या कंपन्यांनी सार्वजनिक निधी कसा वळवला आणि बँकांच्या नियमांना बगल देऊन कर्जे कशी लाटली, यावर ईडी लक्ष केंद्रित करत आहे. पुढील तपासात समूहातील बड्या धेंडांची नावे समोर येण्याची दाट शक्यता असून, हा तपास आता आर्थिक गुन्हेगारीच्या खोलवर असलेल्या मुळांपर्यंत पोहोचला आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : २६/११च्या सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात अनुपस्थितीत खटल्याची प्रक्रिया सुरू, ॲड. उज्ज्वल निकम यांची माहिती

Jalgaon : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आता भारतातच

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश मुंबई : गणेशोत्सवाच्या

Nashik Crime : विंचूरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या, कारसह ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला

Nashik Crime : प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात गेली अन्...; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात