Nitesh Rane : जळगाव जामोदमध्ये फिशिंग क्लस्टर उभारणीसाठी सकारात्मक प्रयत्न; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक फिशिंग क्लस्टर विकसित करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलत असून, यामुळे स्थानिक मत्स्यव्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. (Nitesh Rane)


महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्लस्टर विकास कार्यक्रम (MSI-CDP) अंतर्गत उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद मतदारसंघातील सिंचन प्रकल्पामध्ये फिशिंग क्लस्टर विकसित करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीस आमदार संजय कुटे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ पी अन्बळगण,मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी,तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Nitesh Rane)



यावेळी श्री नितेश राणे म्हणाले,महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्लस्टर विकास कार्यक्रम (MSI-CDP) अंतर्गत हा प्रकल्प विकसित झाल्यास मत्स्य उत्पादन, प्रक्रिया उद्योग, शीतसाखळी, मूल्यवर्धन आणि विपणन व्यवस्थेला मोठी चालना मिळेल, जळगाव जामोद तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील तीन सिंचन तलाव असून, त्यावर चार नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांकडून मत्स्यबीज संचयन, मत्स्यसंवर्धन आणि मत्स्य उत्पादनाची कामे नियमितपणे केली जात आहेत. फिशिंग क्लस्टर उभारल्यास या संस्थांचे उत्पन्न वाढण्यासह स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. (Nitesh Rane)


बैठकीत गोराडा, राजुरा आणि सोनापल्ली या सिंचन तलावांवरील विद्यमान मत्स्यव्यवसायाचा आढावा घेण्यात आला. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मत्स्य प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी सुविधा, साठवणूक व्यवस्था आणि मत्स्याधारित पूरक उद्योग विकसित करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्यात आली. (Nitesh Rane)



यावेळी जळगाव जामोद तालुक्यात प्रस्तावित सुमारे १० हजार हेक्टर जलक्षेत्र असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पालाही भविष्यात फिशिंग क्लस्टर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने मोठी क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास विदर्भातील मत्स्य उत्पादन, मत्स्यबीज निर्मिती, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन क्षेत्राला नवी गती मिळेल तसेच बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला बूस्टर डोस; पैठणमध्ये 100, पाचोडमध्ये 50 खाटांचे रुग्णालय

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम

Sindhudurg Umed Mall : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'उमेद' मॉलला मंजुरी

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; गणेशोत्सवाआधी जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची पालकमंत्र्यांची

Marathi Bhasha : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास 'बॅज' निलंबित करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २० ऑगस्टपासून राज्यभरात अंमलबजावणी मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना