Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' संकल्पना; मंत्री नितेश राणे यांच्या दालनात सादरीकरण

- शासकीय लाभ १०० टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार


मुंबई : केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि गोव्याच्या 'स्वयंपूर्ण गोवा' या यशस्वी उपक्रमांच्या धर्तीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या योजनेमुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार असून, जिल्हा विकासाचे एक नवे प्रारूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे राहील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात या संकल्पनेचे विस्तृत सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.



'विकसित भारत २०४७' आणि 'विकसित महाराष्ट्र' या ध्येयपूर्तीसाठी शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एक जबाबदार अधिकारी नियुक्त केला जाईल. याशिवाय, आधुनिक डिजिटल संवाद व्यवस्था आणि थेट लाभार्थी-केंद्रित अंमलबजावणीची एक मजबूत यंत्रणा गावपातळीवर उभारण्यात येणार आहे. यामुळे प्रशासकीय कामांत गतिशीलता येण्याबरोबरच शासकीय योजनांमधील पारदर्शकता वाढेल आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. (Nitesh Rane)



डिजिटल ग्रामपंचायती आणि रोजगारनिर्मितीवर भर :


- या नव्या संकल्पनेमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती खऱ्या अर्थाने 'डिजिटल ग्रामपंचायती' म्हणून सक्षम होतील. कागदोपत्री विकास न करता, लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर यात भर दिला जाणार आहे. गावातील स्थानिक संसाधनांचा वापर करून तिथेच नवीन रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणे हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असणार आहे.
- मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होत्या. तसेच या प्रकल्पाच्या नियोजनासाठी कैलास सावंत, सचिन सावंत, नितीन पांढरपट्टे आणि सुयोग दीक्षित आदी उपस्थित होते. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला बूस्टर डोस; पैठणमध्ये 100, पाचोडमध्ये 50 खाटांचे रुग्णालय

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम