Ashadhi Wari 2026 : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; वारीच्या वाटेवर प्रशासनाने उभारली खास सुविधा

 Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुणे जिल्ह्यातून पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने विविध ठिकाणी विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिदक्षता (ICU) सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. (Ashadhi Wari)



आपत्कालीन परिस्थितीत वारकरी तसेच इतर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी या केंद्रात तीन अतिदक्षता खाटा आणि दोन ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघात, हृदयविकार, श्वसनाचा त्रास,

">अपघात तसेच इतर गंभीर आजारांवर त्वरित उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (Warkari Health)


आरोग्य केंद्रात 24 तास सेवेसाठी आयसीयू फिजिशियन, भूलतज्ज्ञ आणि फिजिशियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ आणि अस्थिरोगतज्ज्ञ यांची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Pandharpu Wari)



वारी मार्गावरील भाविकांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्य सेवा मिळावी, गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार करून आवश्यक असल्यास त्यांना पुढील रुग्णालयात सुरक्षितपणे हलवता यावे, यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. ( Medical Facility for Warkari)


आषाढी वारीच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधसाठा, जीवनरक्षक उपकरणे आणि आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक सर्व व्यवस्था उपलब्ध ठेवण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.


Tags
महाराष्ट्रपुणेवारकरीआरोग्य विभागप्राथमिक आरोग्य केंद्रपंढरपूर वारीआषाढी वारीMaharashtra newsPune newsPandharpur WariAshadhi Wari 2026Ashadhi WariWarkari HealthLoni Kalbhor PHCICU FacilityHealth Department MaharashtraMedical Facility for Warkariलोणी काळभोरICU सुविधा
Comments
Add Comment

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग