Maharashatra Rain Update : राज्यात पावसाचा पॅटर्न बदलणार; कोकणात दिलासा, उत्तर महाराष्ट्र-विदर्भ- मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा (Rain) जोर आता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain Update)


भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यातील पावसाचा मुख्य पट्टा आता पूर्व आणि उत्तर भागांकडे सरकत असून पुढील 48 ते 72 तासांत या विभागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात हा बदल होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. (Monsoon Update)



गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. आता या भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता असून, त्याचवेळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Heavy Rain Alert)


संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत असून नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Update)



हवामान विभागाने विशेषतः नदीकाठच्या भागात राहणारे नागरिक, शेतकरी आणि डोंगराळ परिसरातील रहिवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामाशिवाय धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असेही स्पष्ट केले आहे.


Comments
Add Comment

Ahilyadevi Holkar Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ

- राज्य सरकारचा निर्णय; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेसाठी मानक कार्यप्रणाली

Water Ambulance : मुंबई महानगर प्रदेशात सुरू होणार 'वॉटर ॲम्ब्युलन्स'

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; संबंधित विभागांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Chandrashekhar Bawankule : सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण

- २०१० पासूनची स्थगिती उठणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण

SIR : महाराष्ट्रात 'एसआयआर'च्या वेळापत्रकात बदल

- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; प्रारूप यादी आता ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार मुंबई : महाराष्ट्रातील

Eknath Shinde : 'फार्म टू फॉरेन' मोहिम देणार महाराष्ट्रातील कापड उद्योगाला जागतिक स्थान - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने