धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर (Palghar) जिल्ह्यातील वांद्री धरण परिसरातील ...
घरात चार जण अडकल्याची माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्याचे (Padgha Police) वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे त्यांनी स्वतः पाण्यात उतरून बचावकार्य सुरू केले.
या बचाव मोहिमेत चार वर्षांची देविका पवार, अश्विनी पवार (२५), संतोष पवार (२८) आणि जोशना साळुंखे (६०) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुसळधार पावसामुळे घराभोवती पाणी साचल्याने हे कुटुंब बाहेर पडू शकत नव्हते. ( heavy rain Maharashtra)
Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात धोक्याची घंटा वाजली आहे. घाटमाथ्यावर ...
पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून संबंधित कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले. त्यांच्या धाडसी बचावकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कल्याण-डोंबिवली आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पूरस्थिती असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.





