Nashik : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा पेठ दौरा; आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन तयारीची पाहणी

Nashik : नाशिक जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आज पेठ तालुक्याचा दौरा करून आरोग्य यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापनाची तयारी तसेच पूर व भूस्खलन संभाव्य भागांतील उपाययोजनांचा आढावा घेतला.



प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट


दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र करंजाळी येथे भेट देऊन आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा, आवश्यक वैद्यकीय सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. विशेषतः अतिवृष्टीमुळे संपर्क तुटण्याची शक्यता लक्षात घेऊन उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांना आगाऊ सुरक्षित आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.



सर्पदंशाशी निगडीत लस उपलब्ध करण्याच्या सूचना


प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या गरोदर मातांची पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गरोदर महिलांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, पोषण आहार व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या, पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य सर्पदंशाच्या घटनांसाठी सर्पदंशाशी निगडीत लस देखील उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, अतिवृष्टीच्या काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मातांना व नवजात बालकांना तातडीने सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.


यानंतर पवार यांनी गुजरात सीमेवरील ग्रामपंचायत भुवन येथे भेट देऊन संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली. सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर, निवारा केंद्रांची उपलब्धता, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, औषधसाठा तसेच आपत्कालीन संपर्क व्यवस्था याबाबत त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली.



आश्रमशाळेलाही दिली भेट


यावेळी त्यांनी भुवन येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमशाळेलाही भेट दिली. अतिवृष्टी, भूस्खलन किंवा अन्य आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी पूर्वनियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांच्या निवास, अन्न, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक ती तयारी ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


अतिवृष्टीच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी यावेळी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉ. वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, सहायक गट विकास अधिकारी सुनील बागूल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे, विस्तार अधिकारी महाले व गायकवाड आदि उपस्थित होते.

Comments
Add Comment

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Science Centre Metro Station : सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी कोस्टल रोड प्रोमेनेडपर्यंत भुयारी पादचारी मार्ग

टीओडी अंतर्गत केला जाणार विकास, प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार खर्च एमएमआरसीएलच्या

Kandivali Fire : कांदिवलीत हॉटेलजवळ आग; 11 जणांची सुखरूप सुटका

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. कांदिवली स्टेशन रोडवरील अभिराई

BMC : मुंबई महापालिकेचे नगरसेवक आता हायटेक

विविध समित्यांचे अजेंडा आता त्यांच्या मोबाईलवर प्रस्तावांच्या छपाईसह वितरणावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च

BMC Security : मुंबई महापालिका मुख्यालयाची नजर आता अधिक तीक्ष्ण

एआय आधारीत बसवले जाणार ८७ सीसी टिव्ही कॅमेरे मुंबई (सचिन धानजी)  : मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.