Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात ; लालपरी, कारच्या अपघातात तीनजण गंभीर

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण अपघात होवून कारमधील तीनजण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली. जखमींना लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर अधिक उपचार सुरु आहेत.(Accident News)



नेमकं काय घडलं ?


आज मंगळवारी (७ जुलै) दुपारी साधारण पावणे चार वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची बस (एम एच १४ एल एक्स ९८१८) ही सिंदखेडा-पुणे ही सिंदखेडा डेपोची बस नगरकडे जात होती तर ममदापूर (ता. राहाता) येथील तिघेजण पाटिलवाडी (कोल्हार खुर्द) येथील अंत्यविधी उरकून टाटा व्हिस्टा कारने (एम एच १७ एजे २८१५) कोल्हार कडे चालले होते. (Accident News)



दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक


नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरु असल्याने आणि एका बाजूचा रस्ता खराब असल्याने, बसचालकाने रस्त्यावरील कोल्हार खुर्द शिवारातील ढाब्याजवळून बस विरुद्ध बाजूने घातली होती. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारची समोरची बाजू बसच्या खाली शिरली. या अपघातात कारचा अक्षरश चक्काचूर झाला. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडल्याचं मन हेलावणार चित्र याठिकाणी पाहायला मिळाल.(Accident News)



दोघांची प्रकृती गंभीर


कारमधील राजू शेख, कदीर शेख व नजीर गुलाब सय्यद यांना अक्षरश: कारचे दरवाजे तोडत स्थानिक रुग्णवाहिकेचा मालक निखिल भोसले, अभिषेक जाधव, रोहन साळवे या तरुणांनी अन्य प्रवाशांच्या मदतीने बाहेर काढत लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या तीघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (Accident News)


अपघातानंतर बसचालक बस सोडून पळून गेला असल्याची प्राथमिक समोर येत आहे. बसमधील प्रवासी या अपघाताने भयभीत झाल्याचे वातावरण होते. दोन्ही वाहनांना जेसीबी च्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. राहुरीचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख फौजफाट्यासह अपघातस्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांकडून वाहतूक पुर्ववत करण्यात आली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Comments
Add Comment

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला

Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागात 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा

Devendra Fadnavis : गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई

Maharashtra Revenue Department : महसूल विभागाच्या अभियानात ३,४३६ महिलांना शेतकरी दर्जा; ६ दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना योजनांचा लाभ

मुंबई: महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत

Titamba Ashram School : टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधाप्रकरणी अखेर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून

MPSC Paper Leak : एमपीएससी' पेपरफुटीच्या आरोपांप्रकरणी आयोग पोलिसांत

- पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध