BMC : मुंबई महापालिकेचे नगरसेवक आता हायटेक

विविध समित्यांचे अजेंडा आता त्यांच्या मोबाईलवर


प्रस्तावांच्या छपाईसह वितरणावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार


मुंबई (सचिन धानजी : मुंबई महापालिकेतील नगरसेवक आता हायटेक होणार असून महापालिका सभागृह आणि विविध वैधानिक तसेच विशेष समित्यांच्या पटलावर ठेवण्यात येणारे विषय पत्रिकांचे वाटप आता त्यांच्या मोबाईलवरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिकेच्यावतीने आता महापालिकेच्या विविध समित्यांसाठी डिजिटल मीटिंग मॅनेजमेंट प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर नगरसेवक आणि अधिकारी हे आपल्या मोबाईलमध्ये करून शकतात तसेच टॅब, आयपॅडमध्येही करू शकतात. त्यामुळे भविष्यात नगरसेवकांना टॅब उपलब्ध झाल्यास त्यातही या प्रणालीचा वापर होणार आहे. त्यामुळे आता महापालिका सचिव विभागाच्या डोक्यावरील बराच भार कमी होईल तसेच याच्या छपाईवर तसेच वितरणावर होणारा कोट्यवधी रुपयांच्या खर्च कमी होईल.


मुंबई महापालिकेतील २३७ नगरसेवकांना महापालिका सभा तसेच स्थायी, शिक्षण, सुधार व बेस्ट या चार तसेच १७ प्रभाग समिती या वैधानिक समित्यांसह स्थापत्य शहर, स्थापत्य उपनगरे, विधी व महसूल, महिला व बाल कल्याण, सार्वजनिक आरोग्य तसेच उद्यान व बाजार समिती आदी विशेष समित्यांच्या पटलावर ठेवण्यात येणाऱ्या विषय पत्रिकांचे अजेंडा सहपत्रासह प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या घरी पाठवले जातात. महापालिका सभागृहाची अजेंडा हा सर्व नगरसेवकांना आणि समितीचे सदस्य असलेल्या संबंधित नगरसेवकांना त्या समितीचे अजेंडा पाठवला जातो. परंतु महापालिका तसेच विविध समित्यांच्या पटलावर ठेवण्यात येणाऱ्या विषयांचा अजेंडा आणि सहपत्रे याची छपाई आणि प्रत्येक सदस्याच्या घरी केले जाणारे वितरण, यासाठी वाहतूक सुविधा, शिपाई वर्गाचा ओव्हरटाईम यावर वर्षांला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.



त्यामुळे आता महापालिकेचा कारभार पेपरलेस करताना नगरसेवकांना मिळणारा अजेंडाही आता सॉफ्ट कॉपी स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी डिजिटल मिटींग मॅनेजमेंट प्रणाली विकसित केली जात आहे. यासाठी बोर्ड पॅक या कंपनीच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित केली जात असून यावर सुमारे ४२.७७ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. या प्रणालीद्वारे अजेंडा तयार करणे, मंजुरी आणि प्रसारण आदींसह बैठकीच्या सूचना व स्मरणपत्रे, डिजिटल टिपणे, मागील बैठकीचे संशिप्त विवरण. डॅशबोर्ड व अहवाल सुविधा आदींचा समावेश असेल.


शिवाय क्लाऊड आधारीत ही प्रणाली असून यावर वेब व आयपॅड आधारीत प्रवेश असेल. तर सेंट्रलाईज संग्रह, शिवाय बॅकअप व आपत्ती पुनर्प्राप्ती व्यवस्था, एसएमएस, इमेल व व्हॉट्सअप सूचना एकत्रीकरणाची सुविधाही याद्वारे दिली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी नगरसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर पुढील महिन्यात ही सुविधा नगरसेवकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच्या मग ते मोबाईल एंड्राईड असो वा ऍपल असो. यावर ही प्रणाली उपलब्ध होऊ शकेल.तसेच भविष्यात टॅबवरही ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल असेही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Science Centre Metro Station : सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी कोस्टल रोड प्रोमेनेडपर्यंत भुयारी पादचारी मार्ग

टीओडी अंतर्गत केला जाणार विकास, प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार खर्च एमएमआरसीएलच्या

Kandivali Fire : कांदिवलीत हॉटेलजवळ आग; 11 जणांची सुखरूप सुटका

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. कांदिवली स्टेशन रोडवरील अभिराई

BMC Security : मुंबई महापालिका मुख्यालयाची नजर आता अधिक तीक्ष्ण

एआय आधारीत बसवले जाणार ८७ सीसी टिव्ही कॅमेरे मुंबई (सचिन धानजी)  : मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या

Ganeshotsav 2026 : मूर्ती विसर्जनासाठी समुद्रातील भरतीची भीती नसेल गणेश भाविकांना

महापालिकेच्यावतीने समुद्रात २१ विसर्जन ठिकाणी बसवणार ओहोटी रेषा दर्शवणारी मार्गदर्शक तरंगचिन्हे मुंबई (सचिन

Ghatkopar School : घाटकोपर येथील टिळकमार्ग महानगरपालिका शाळा इमारत झाली खुली

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका एन विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे टिळकमार्ग येथे नव्याने

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना