अथर्व प्रमोद जगताप (वय 19, रा. आंबेगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. 15 ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास अथर्व हा डेक्कन जिमखाना परिसरातील ‘फ्लाइंग जिप्सी’ हॉटेलमधून बाहेर पडत होता. त्यावेळी आरोपींनी त्याला हॉटेलच्या बाहेर अडवून धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घाबरलेल्या अथर्वने पुन्हा हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्या डोक्यात शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. (Pune News)
टीओडी अंतर्गत केला जाणार विकास, प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार खर्च एमएमआरसीएलच्या माध्यमातून राबवला जाणार प्रकल्प, त्यांच्या ...
यानंतर आरोपींनी हॉटेलमधील खुर्ची त्याच्यावर फेकून मारली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. घटनेनंतर अथर्वने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून दोन तरुणींसह तिघांना ताब्यात घेतले. (Deccan Gynkhana)
अटक करण्यात आलेल्यांमध्ये माधवी कुंभार (रा. हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांचा समावेश आहे. या तिघांसह आणखी 7 ते 8 जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अथर्व आणि आरोपींची आधीपासून ओळख होती. काही महिन्यांपूर्वी सातारा येथे त्यांच्यात वाद झाला होता. त्याच वादातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत. (Attack)
दरम्यान, हॉटेल परिसरात वारंवार होणाऱ्या गोंधळाच्या घटनांबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.