मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. कांदिवली स्टेशन रोडवरील अभिराई हॉटेलजवळील फळांच्या स्टॉलला तसेच जवळच्या इमारतीतील काही भागाला आगीचा फटका बसला. ही घटना 17 ऑगस्ट रोजी पहाटे 4.14 वाजता मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. (Kandivali Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, फळांच्या स्टॉलमधील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, लाकडी फर्निचर, ताडपत्री, बांबू आणि प्लास्टिकच्या वस्तूंना आग लागली होती. तसेच जवळच्या तिरुपती बँक्वेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सुमारे 50 चौरस फूट भागातील कपडे, लाकडी फर्निचर आणि फॉल्स सिलिंगलाही आगीचा फटका बसला. इमारतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या अॅल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या सजावटीच्या शीटलाही आग लागली होती. (Mumbai Fire)
ही इमारत बेसमेंट, तळमजला आणि त्यावरील 4 मजली व्यावसायिक इमारत असल्याची माहिती आहे. आगीमुळे संपूर्ण इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. (Mumbai Fire News)
विविध समित्यांचे अजेंडा आता त्यांच्या मोबाईलवर प्रस्तावांच्या छपाईसह वितरणावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार मुंबई (सचिन धानजी : मुंबई ...
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील लॉजिंग हाऊसमध्ये अडकलेल्या 11 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जिन्याच्या माध्यमातून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही. (Fire Incident)
अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे 6.07 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार विद्युत वायरिंग आणि उपकरणांमुळे आग लागल्याचा संशय आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ धावपळ उडाली होती.